spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ताडोबामध्ये २०० पशु-पक्ष्यांचा आवाज काढणारा बर्डमॅन

द्रपूर जिल्यातील ताडोबा येथील व्याघ्र प्रकल्प हे आपल्या येथील खूप मोठे अभयारण्य मानले जाते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात भरपूर प्रकारचे पशु- पक्षी आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध पशु पक्ष्यांचे २०० आवाज काढणारा अनोखा अवलिया कार्यरत आहे.

चंद्रपूर जिल्यातील ताडोबा येथील व्याघ्र प्रकल्प हे आपल्या येथील खूप मोठे अभयारण्य मानले जाते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात भरपूर प्रकारचे पशु- पक्षी आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध पशु पक्ष्यांचे २०० आवाज काढणारा अनोखा अवलिया कार्यरत आहे.आणि म्हणूनच ताडोबामध्ये येणाऱ्या पर्यटकांना पशु, पक्ष्यांचे विविध आवाज काढून दाखवत असल्याने ताडोबामध्ये त्याला ‘बर्डमॅन’ म्हणून ओळखले जात आहे. सुमेध वाघमारे असे त्यांचे नाव आहे. या ‘बर्डमॅन’मुळे पर्यटकांना पशु व पक्ष्यांचा आवाज ऐकायला मिळतो.

येथे येणाऱ्या पर्यटकांस व्याघ्रदर्शन होत असल्याने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील पर्यटक जंगल सफारी व व्याघ्र सफारीसाठी ताडोबात येत असतात. ताडोबामध्ये वाघ, बिबट्यासह पशु, पक्षीसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. ताडोबात जवळपास २०० हून अधिक पशू व पक्ष्यांची नोंद आहे. शहरी भागातील वाढते औद्योगिकरण, सिमेंटची घरे, प्रदूषण यामुळे पक्षी नाहीसे होत आहे. त्यामुळे लुप्त होत असलेल्या पक्ष्यांना बघणे व त्यांचा आवाज ऐकणे हा एक सुखद क्षण आहे.ताडोबामध्ये कार्यरत असलेले सुमेध वाघमारे हे तब्बल २०० पशु, पक्ष्यांचे आवाज काढतात. चिमणी, कावळा, मोर, लांडोर, कोंबळी, कोकीळा, रानम्हैस, रानगवा यासह २०० हून अधिक पशु व पक्ष्यांचे आवाज काढून पर्यटकांना याबद्दल माहिती देत आहे. यामाध्यमातून ते निसर्गाला वाचविण्याचा संदेश देत असतात.

सुमेध वाघमारे याना आवाज काढण्याचे उपजत कलागुण आहे. परिस्थितीशी दोन हात करित कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कधी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय केला, तर कधी अन्य काम करून पोट भरले. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात परिक्षा देण्यासाठी वाघमारे चंद्रपुरात आले. त्यांच्या उपजत कलागुणांची दखल ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्यासह ताडोबा कोरचे उपवनसंरक्षक नंदकुमार काळे, मोहुर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी घेतली. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वीच वाघमारे ताडोबात दाखल झाले.ताडोबात आता ते वेगवेगळ्या पक्षांचा आवाज काढून पर्यटकांचे मनोरंजन करतात. तसेच त्यांच्या आवाजाचे ‘शो’देखील ताडोबात आयोजित केले जात आहे.

हे ही वाचा : 

Salman Khan ने स्वतःच्या सुरक्षतेमध्ये केली खास व्यवस्था, खरेदी केली नवी कोरी Nissan Patrol SUV

SRHvsLSG, सनरायजर्स हैदराबादचा संघ पहिला विजय मिळवणार का? लखनौ सुपर जायंट्स पडणार भारी

दुग्धजन्य पदार्थांची आयात न करण्याची विनंती, दुग्धविकास मंत्री पुरूषोत्तम रूपालांना शरद पवारांचं पत्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss