spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कांद्याचे सेवन केल्याने आश्चर्यकारक फायदे

कोणत्याही हॉटेलमध्ये (Hotel) गेल्यावर कांदा (Onion) सर्व्ह केला जातो. तसेच जेवण करताना कांदा कापून खायला अनेक जणांना आवडते. कांद्यामध्ये खूप औषधी गुणधर्म (Medicinal properties) आहेत, ज्यामुळे आपले आरोग्य (Health) निरोगी राहते.

कोणत्याही हॉटेलमध्ये (Hotel) गेल्यावर कांदा (Onion) सर्व्ह केला जातो. तसेच जेवण करताना कांदा कापून खायला अनेक जणांना आवडते. कांद्यामध्ये खूप औषधी गुणधर्म (Medicinal properties) आहेत, ज्यामुळे आपले आरोग्य (Health) निरोगी राहते. उन्हाळ्यामध्ये कच्च्या कांद्याचे सेवन करावे कारण कांदा खाल्ल्याने अनेक फायदे होतात. कांद्यामध्ये अँटी ऍलर्जी (Anti allergy) , अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) , कार्सिनोजेनिक (Carcinogenic) हे गुणधर्म असतात तसेच कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए (Vitamin A) देखील जास्त प्रमाणात असते. व्हिटॅमिन बी (Vitamin B) कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी (Vitamin C) देखील कांद्यामध्ये आढळते.

कांद्याचे सेवन केल्याने होणारे फायदे (benefits) –

  • उन्हाळ्यामध्ये वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका सर्वाधिक असतो त्यामुळे उष्माघाताचा धोका कमी करण्यासाठी कांद्याचे सेवन करणे गरजेचे आहे. कांद्यामुळे शरीर हायड्रेट राहते.
  • रोगप्रतिकारक शक्ती (immune system) वाढवण्यासाठी कांदा खाणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते आणि त्यामुळे कांद्यामध्ये रोगप्रतिकारक पेशी टिकवून ठेवण्याचा गुणधर्म असतो.

  • कांदा खाल्ल्याने पचनक्रियेमध्ये सुधारणा होते कारण कांद्यामध्ये फायबर (fiber)असते. त्यामुळे बद्धकोष्ठता (Constipation) आणि गॅस यांसारख्या समस्या दूर होतात. कांदा खाल्याने आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया (Bacteria) वाढण्यास मदत होते. ज्यामुळे पचन क्रिया सुधारते.
  • कांद्यामध्ये कर्करोग (Cancer) विरोधी गुणधर्म देखील असतात. ते शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखत नाहीत तर त्यांचा नाशही करतात. अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जे लोक कांदा खातात त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी असतो.
  • कांदा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. कांद्यामध्ये अनेक घटक असतात जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात. व्हिटॅमिन डी हाडे मजबूत करण्याचे काम करते आणि जर तुम्ही त्यासोबत कांद्याचे सेवन केले तर तुमची हाडे नक्कीच मजबूत होतील.

हे ही वाचा : 

नवनीत राणांच्या टीकेवर मनीषा कायंदे यांचे प्रत्युत्तर…

जागतिक आरोग्य संघटनेचा ७५ वा जागतिक आरोग्य दिन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार,आमदारांचा ९ एप्रिलला अयोध्या दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss