spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मास्क सक्ती

संपूर्ण देशात कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात ही केली आहे. सध्या देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णामध्ये सातत्याने वाढ ही होत आहे.

संपूर्ण देशात कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात ही केली आहे. सध्या देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णामध्ये सातत्याने वाढ ही होत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणांचं टेन्शन वाढलं आहे. महाराष्ट्रासह दिल्ली आणि केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

कोरोनाची वाढ ही दिवसेंदिवस होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगपालिका देखील ऍक्शन मोड मध्ये आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क सक्ती ही करण्यात आली आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क अनिवार्य करण्यात आली आहे.त्याशिवाय, वय ६५ वर्षांवरील अधिक वयाच्या व्यक्तींना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने मास्क सक्ती करण्याच्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

 तसेच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण देशभरात १० आणि ११ एप्रिलला मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज आणि उद्या अशा दोन दिवसांत देशभरात मॉकड्रील पार पडत आहे. मुंबईत आज सकाळी ११ वाजता जे. जे. रुग्णालयात, दुपारी १२ वाजता सेंट जॉर्ज रुग्णालय तर दुपारी १ वाजता बॉम्बे रूग्णालयात मॉकड्रील पार पडली आहे.

तसेच या दोन दिवसांच्या मॉकड्रील मध्ये शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे. रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधं, मुबलक कर्मचारी संख्या आणि विविध सामाग्री रुग्णालयात आहे की नाही? याची खात्री केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार, सद्यपरिस्थितीत पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात कोव्हिडचे सर्वाधिक रुग्ण आहेत. रविवारी गेल्या २४ तासांत देशात ५,३५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर सक्रिय रुग्णांची संख्या ३२,८१४ वर पोहोचली आहे. अनेक राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे पुन्हा बंधनकारक केले आहे, तर अनेक राज्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.

 

हे ही वाचा : 

महाराष्ट्र -उत्तरप्रदेश यांच्यात खुलणार दोस्तीचा नवा अध्याय Maharastra-UP will build new friendly relation

महाआरती नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माध्यमांशी संवाद | Eknath shinde | Ayodhya

शरयू नदीच्या किनाऱ्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती संपन्न

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss