spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MIvsDC, कोणता संघ आज खाते उघडणार, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

इंडियन प्रीमियर लीग २०२३मध्ये (Indian Premier League 2023) यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाच्या शोधात असणारे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) हे संघ आज मंगळवारी आमनेसामने असणार आहेत.

इंडियन प्रीमियर लीग २०२३मध्ये (Indian Premier League 2023) यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाच्या शोधात असणारे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) हे संघ आज मंगळवारी आमनेसामने असणार आहेत. या सामन्यांमध्ये दोन्ही संघामधील स्थानिक खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. ‘आयपीएल’मधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने यंदाच्या सिझनची सुरुवात निराशाजनक केली आहे. सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून (Royal Challengers Bangalore) पराभूत झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईचा संघ कामगिरी उंचावेल अशी अपेक्षा होती परंतु चेन्नई विरुद्ध मुंबईच्या संघाने अधिकच निराश केल आहे.

मुंबई इंडियन्सचे आघाडीचे फलंदाज आणि गोलंदाज अपयशी ठरले आहेत. परंतु दिल्लीच्या संघातील अजूनही लय सापडली नसल्याने या सामन्यात दमदार कामगिरी करून विजयाचे खाते उघडण्याची मुंबईकडे उत्तम संधी आहे. कार अपघातामध्ये जखमी झालेला ऋषभ पंत शिवाय खेळणाऱ्या दिल्लीच्या संघाने सुरुवातीच्या तीनही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीचे नेतृत्व करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने (तीन सामन्यांत १५८ धावा) फलंदाजीत छाप पाडली असली, तरी कर्णधार म्हणून त्याला संघाची मोट बांधता आलेली नाही. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळताना मुंबईविरुद्ध अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी वॉर्नरवर दडपण असेल.

मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांसारखे खेळाडू आहेत तर दिल्लीकडे पृथ्वी शॉ, सर्फराज खान, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांसारखे गुणवान भारतीय खेळाडू आहेत. परंतु या खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही त्यामुळे या दोन्ही संघांना फटका बसला आहे. त्यामुळे ज्या संघाचे भारतीय खेळाडू आपली कामगिरी उंचावत आणि त्या संघाला या सामन्यांमध्ये विजयाची अधिक संधी असेल. आज हा सामना ७.३० खेळवला जाणार आहे.

हे ही वाचा : 

५६ वर्ष ज्या घराण्यामध्ये तुम्ही जन्माला आले ते घर टिकवू शकले नाही, नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Exclusive : भाजपाला पोहोचायचं राज्यातल्या ३ कोटी कुटुंबात

Armaan Malik ने दिली खुशखबर, दुसरी पत्नी Kritika Malik बनली आई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss