spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आमने – सामने

राजकारणात रोज नवीन विषय सुरु असतात टकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर आता नवीन विषय राजकारणात डोकं वर करू बघत आहे. अयोध्या दौरा झाला सगळे शिवसैनिक आपल्या राज्यात परतही गेले. काही शिवसेनेतील नेते मंडळी अवकाळी पावसाची आणि गारपीट पडणाऱ्या राज्यातील लोकांची परिस्थिती काय आहे हे बघायला गेले होते. असे असतानाच आता राजकारणात नवीन विषय सुरु झाला आहे.

राजकारणात रोज नवीन विषय सुरु असतात टकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर आता नवीन विषय राजकारणात डोकं वर करू बघत आहे. अयोध्या दौरा झाला सगळे शिवसैनिक आपल्या राज्यात परतही गेले. काही शिवसेनेतील नेते मंडळी अवकाळी पावसाची आणि गारपीट पडणाऱ्या राज्यातील लोकांची परिस्थिती काय आहे हे बघायला गेले होते. असे असतानाच आता राजकारणात नवीन विषय सुरु झाला आहे. आता नवीन विषय आहे तो म्हणजे बाबरी मशीद. बाबरी मशिदीचा मुद्दा हा भाजपा नेते तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उठवला आहे. बाबरी मशीदिचा मुद्दा मांडताना बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला.या मुद्यावरूनसंजय राऊत यांनी चंद्रकांत पाटीलयांना प्रतिउत्तर दिले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, अयोध्येतून आल्यावर चंद्रकांत पाटील सांगतात की बाबरीसंदर्भातील त्या घटनेत शिवसेनेचा आणि शिवसेनाप्रमुखांचा काडीमात्र संबंध नव्हता. ते फार कुचेष्ठेने बोलले. यावर मिंधे काय म्हणतात हे आम्हाला ऐकायचं आहे. महाराष्ट्र आणि देश ऐकू इच्छितोय कि मिंधे काय बोलून हिम्मत दाखवतायत का की परत एकदा शरण जातायत असे संजय राऊत म्हणाले. आयोध्याच्या संदर्भात आणि त्यानंतरच्या घडामोडीत हिंदूत्वाची मशाल पेटती राहावी यासाठी बाळासाहेबांनी केलेला त्याग या देशाला माहितेय आणि त्याच त्यागातून भारतीय जनता पक्ष तयार झाला आहे असेही संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे त्या बाबरी मशिदीचे कांड झाल्यानंतर लखनऊला जाऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर स्वतःहून जाऊन हजर झाले होते, त्यातील ते प्रमुख आरोपी होते. हे भाजपला माहिती नाही का? असा सवाल देखील संजय राऊतांनी भाजपला केला.

इतक्या वर्षांनी हा विषय काढण्याची आणि त्यावर भाष्य करण्याची वास्तविक काहीच गरज नाही ही मुद्दाम बाळासाहेब आणि शिवसेनेवर केलेली चिखलफेक आहे. शिवसेनेचं आस्तित्व संपवण्यासाठी चाललेले हे खेळ आहेत असेही संजय राऊत म्हणाले. राज्यात चाललेल्या बाकीच्या प्रश्नावर लकाझ केंद्रित करण्याऐवजी भाताचे आणि मिंडे गटाचे लक्ष वेळाच दिशेने चालते आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले त्यावेळेचा ढाचा पडल्यानंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब तिथे गेले होते, शिवसेना तिथे गेली होती का बजरंग दल तिथे होतं? कारसेवक कोण होते? काही एवढं जनरलाइज करण्याचं कारण नाही. कारसेवक हिंदू होते. कारसेवक बजरंग दल आणि दुर्गा वहिनींच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असे नव्हते की हम बजरंग दल का नाम नही लेंगे. हम ना शिवसेना के नाही, बजरंग दल के नही असं त्यांचं नव्हतं. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं. की ये कर सकते है आणि त्यांनी केलं ते,” असं चंद्रकांत पाटील मुलाखतीवेळी बोलताना म्हणाले.

हे ही वाचा : 

MIvsDC, कोणता संघ आज खाते उघडणार, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

बॉलीवूडच्या भाईजानचा लवकरच नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

मुख्यमंत्री अहमदनगरसह धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तर आणखी ५ दिवस पावसाचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss