spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरेंसह फडणवीसांना देखील शरद पवार यांनी सुनावले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणामुळे ठाण्यासह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं होतं. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासमवेत यांनी स्वत: रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणामुळे ठाण्यासह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं होतं. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासमवेत यांनी स्वत: रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांवर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. त्यामुळे अजूनच गदारोळ माजला. आणि त्यामुळे राजकारणात शाब्दिक चकमकीला सुरवात झाली.

“महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभलाय” असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होत. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना प्रतिउत्तर देऊन नवीन डायलॉग बाजी करताना म्हणाले, “मै फडतूस नही, काडतूस हू… झुकेगा नही, घुसेगा साला” असं प्रत्युत्तर दिलं. यानंतर “फडतूस आणि काडतूस” शब्दाचा वाद वाढतच गेला. आणि या वादावर अनेक बड्या नेत्यांनी आपले मत जाहीरपणे मांडले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘फडतूस आणि काडतूस’ वरील वादावरून उद्धव ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांचे चांगलीच कान उघाडणी करताना दिसले आहेत. फडतूस-काडतूस’ टीकेबद्दल विचारलं असता शरद पवार म्हणाले, “मला जो महाराष्ट्र माहीत आहे.

मला जी महाराष्ट्रातील संस्कृती माहीत आहे. मला महाराष्ट्रातील जनतेची मानसिकता माहीत आहे.तेथे अशा बड्या नेत्यांनी काढलेले उद्गार बरोबर नाही. त्यामुळे अशा गोष्टी शक्यतो टाळायला हव्यात.कोणत्याही राजकीय नेत्यांनी कोणत्याच नेत्यावर वैयक्तिक टीका करू नये. तुम्ही राजकीय किंवा लोकांच्या प्रश्नांवरून आक्रमक राहा. पण वैयक्तिक टीका टिप्पणी किंवा चिखलफेक करून नका. त्यामुळे आपणच आपली प्रतिमा मलिन करतो याकडे लक्ष दिले पाहिजे. मला माहित आहे राजकारणात मतभेद असतात, मतभिन्नता असते. पण टोकाची भूमिका घेणं आपण टाळलं पाहिजे.” असे ठाम मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा : 

महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आता नीच पातळी गाठली – आंनद परांजपे

उद्धव ठाकरे यांची PC LIVE

संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आमने – सामने

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss