spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नामदेव शास्त्रींचा पंकजा मुंडेंना टोला

अहमदनगर जिल्ह्यातल्या भारजवाडी या ठिकाणी नारळी सप्ताह असल्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी पंकजा मुंडे यांना अहंकार आहे तो त्यांनी सोडला पाहिजे अशी टीका नामदेव शास्त्रींनी केली.

अहमदनगर जिल्ह्यातल्या भारजवाडी या ठिकाणी नारळी सप्ताह असल्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी पंकजा मुंडे यांना अहंकार आहे तो त्यांनी सोडला पाहिजे अशी टीका नामदेव शास्त्रींनी केली. नामदेवशास्त्रींनी टोला लगावला पण पंकजा मुंडेंनी जशास तसं उत्तर दिलं, याच वादाची बीडमध्ये चर्चा रंगली आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना जशास तसं प्रत्युत्तर नामदेव शास्त्री याना दिले आहे. बीड जिल्ह्यात या वादाची चर्चेने चांगलाच जोर धरलाय.

“मी पंकजाला मुलगी मानलं आहे. त्यामुळे मी तिच्या विरोधात कधीच जाणार नाही. मात्र तिच्या जवळचे चमचे हरामखोरपणा करतात. पंकजा मुंडे यांनाही खूप अहंकार आहे. त्यांनी त्यांचा अहंकार सोडला पाहिजे.असा टोला नामदेव शास्त्री यांनी केला आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांचंही आयुष्य खूप सुंदर आहे. मात्र एक लक्षात ठेवा तुम्ही जीवनात कितीही मोठे झालात तरीही तुम्हाला स्वाभिमान असला पाहिजे अहंकार नाही.” असं म्हणत नामदेवशास्त्रींनी पंकजा मुंडेंना टोला लगावला.या टोल्याला प्रतिउत्तर देऊन त्याला पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणातून जशास तसं उत्तर दिलं आहे. ” माझा जन्म स्त्रीच्या रुपात झाला आहे. मी जर जोरात बोलले तर तो अनेकांना अहंकार वाटतो. एखादा पुरुष जोरात बोलला तर त्याला वाघ म्हटलं जातं. असे सडेतोड प्रतिउत्तर नामदेव शास्त्री यांना पंकजा मुंडे यांनी दिले आहे. १०० चुका करणाऱ्या पुरुषाला सुधारण्याची संधी मिळते. मला कुठलाही अहंकार नाही. मी फक्त गडाच्या पायथ्याची एक पायरी आहे.” असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना जशास तसं उत्तर दिलं आहे.

पंकजा मुंडे आणि नामदेवशास्त्री यांच्यातला वाद गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. गोपीनाथ मुंडे हयात असताना भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात सहभागी होत असत. त्यांच्या अपघाती निधनानंतर पंकजा मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली होती. मात्र काही दिवसांनी परळीत गोपीनाथगड हे स्थळ पंकजा मुंडे यांनी उभारलं. याच मुद्द्यावरून नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात वाद झाला. त्यानंतर भगवानगडाचे नामदेवशास्त्री यांनी भगवान गडावर दसरा मेळावा होणार नाही अशी भूमिका घेतली आणि परवानगी नाकारली. त्यामुळे पंकजा मुंडे या दरवर्षी गोपीनाथ गडावर दसरा मेळावा घेतात.

हे ही वाचा : 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात नवा ट्विस्ट

ठाकरे गटाला झटका!, तब्बल १९ जणांना ५ वर्षांची शिक्षा

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, महाविकास आघाडीचे मतभेद समोर येऊ लागल्याने ठाकरे पवारांची महत्त्वपूर्ण बैठक?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss