spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतात गरीब स्वप्नंही पाहू शकतो आणि पूर्णही करु शकतो ; द्रौपदी मुर्मू यांनी शपथविधीनंतर जनतेला केले संबोधित

नवी दिल्ली : द्रौपदी मुर्मू यांनी आज देशातील राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ टक्के मतांसह विजय मिळवलेल्या द्रौपदी मुर्मू देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. दिल्लीतील संसद भवनात सकाळी १०.१५ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. त्यानंतर देशाच्या नव्या राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी देण्यात आली. द्रौपदी मुर्मू यांचा शपतविधी पार पडल्या नंतर जनतेला मुर्मू यांनी त्यांच्या भाषणातून संबोधित केले.

द्रौपदी मुर्मू आपल्या भाषणात म्हणाल्या… 

“स्वतंत्र भारतात जन्मलेली मी देशाची पहिली राष्ट्रपती देखील आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगाने काम करावे लागेल. पुढील 25 वर्षात आपल्याला ‘सबका प्रयास, सबका कर्तव्य’ या दोन मार्गांवर वाटचाल करावी लागणार, या 25 वर्षांत अमृतकाळ प्राप्तीचा मार्ग दोन महत्वाच्या मार्गांवर पुढे जाईल. त्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आणि प्रत्येकाचे कर्तव्य या गोष्टी महत्वाच्या आहेत”, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

पुढे मुर्मू यांनी म्हटले, “जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहोत, अशा महत्त्वाच्या काळात मला देशाने राष्ट्रपती म्हणून निवडले आहे. आजपासून काही दिवसांनी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. देश स्वातंत्र्याचे ५० वे वर्ष साजरे करत असताना माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली आणि आज स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात मला ही नवी जबाबदारी मिळाली आहे, हा देखील योगायोग आहे. अशी भावना मुर्मू यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : 

आज पार पडणार द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाचा शपथविधी सोहळा…

“राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणे ही माझी वैयक्तिक उपलब्धी नाही, ती भारतातील प्रत्येक गरिबाची उपलब्धी आहे. विकासाचे फायदे, ते गरीब, दलित, मागासलेले आणि आदिवासी माझ्यामध्ये त्यांचे प्रतिबिंब पाहत आहेत. आज मी सर्व देशवासियांना, विशेषतः भारतातील तरुणांना आणि भारतातील महिलांना खात्री देतो की, या पदावर काम करताना त्यांचे हित सर्वोपरि असेल. माझ्या या नियुक्तीनंतर आजच्या भारतातील तरूणांना नव्या वाटेवर चालण्याचे धाडसही मिळत आहे. अशा प्रगतीशील भारताचे नेतृत्व करताना आज मला अभिमान वाटतो.” असे मत द्रौपदी मुर्मू यांनी मांडले.

 

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढ; महागाई भत्ता ४% वाढणार

Latest Posts

Don't Miss