spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करायला येणाऱ्या अनुयायांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईच्या वाहतुकीत पुढील बदल

Mumbai Ambedkar Jayanti Traffic Restriction : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती राज्यभरात जल्लोषात साजरा केली जाणार आहे. डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त लाखोंच्या संख्येने भिम अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येत असतात.

Mumbai Ambedkar Jayanti Traffic Restriction : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती राज्यभरात जल्लोषात साजरा केली जाणार आहे. डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त लाखोंच्या संख्येने भिम अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येत असतात. राज्यभरातून आजपासूनच डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी यायला सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने चैत्यभूमी व आसपासच्या परिसरात आज व उद्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वाहतूक विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली होती. मुंबईकरांची व अभिवादन करायला येणाऱ्या अनुयायांची वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. या वाहतूक बदलाचे अधिकृत पत्रक वाहतूक विभागाच्या ट्विटर अकॉउंटवरून शेयर देखील करण्यात आले आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून ते उद्या रात्री १२ वाजेपर्यंत दादर चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर परिसराकडे जाणाऱ्या सर्व वाहतुकीमध्ये हे बदल करण्यात आले आहेत.

वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्गांबाबत मार्गदर्शक सूचना

१) दक्षिण वाहिनी पश्चिम द्रुतगती मार्गे, बांद्रामार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांनी

पर्यायी मार्ग

कलानगर जंक्शनकडे येथून डावे वळण घेऊन धारावी टी जंक्शन ते सायन रेल्वे स्थानक किंवा ६० फूट रोड, कुंभारवाडामार्गे सायन रुग्णालय येथे उजवे वळण घ्यावे. अन्यथा बांद्रा-वरळी सागरी उड्डाणपूल मार्गे (सी लिंक) दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करावे.

२) उत्तर वाहिनी महालक्ष्मी रेल्वे स्थानक जंक्शनकडून उत्तर वाहिनीवरून जाणाऱ्या वाहनांनी

पर्यायी मार्ग

पी.डीमेलो रोड, बॅरिस्टर नाथ पै रोड, झकेरिया बंदर रोड, आय. ए. के मार्ग यांचा वापर करून माटुंगा येथील अरोरा ब्रिजखाली उजवे वळण घेऊन सायन हॉस्पिटल जंक्शन मार्गे पुढे मार्गक्रमण करावे, अथवा बांद्रा-वरळी ,सागरी उड्डाणपूल मार्गे (सी लिंक ) उत्तर मुंबईकडे प्रस्थान करावे.

३) उत्तर वाहिनी महालक्ष्मी रेल्वे स्थानक जंक्शनकडून उत्तर वाहिनीवरून जाणाऱ्या वाहनांनी

पर्यायी मार्ग

डॉ. ई. मोजेस रोड, रखांगी चौक येथे उजवीकडे वळण घेऊन सेनापती बापट मार्गे पुढे मार्गक्रमण करावे.

४) पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाने दक्षिणेकडे जाणारी वाहतूक

पर्यायी मार्ग

या वाहनांनी वडाळा ब्रिजचा वापर करून बरकत अली नाका, बी. पी. टी. कॉलनी, पूर्व द्रुतगती मार्गाचा वापर करावा.

अशा सूचना वाहतूक विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तर वाहनांच्या पार्किंग स्थळांमध्येही महत्त्वपूर्ण बदल वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहेत ते पुढील प्रमाणे

‘या’ रस्त्यांवर दोन्ही बाजूस नो- पोर्किंग

१) स्वातंत्रवीर सावरकर मार्ग सेन्च्युरी जंक्शन ते येस बँक जंक्शन
२) रानडे रोड
३) केळुसकर रोड, दक्षिण व उत्तर
४) ज्ञानेश्वर मंदिर रोड

वाहने पार्क करण्यास उपलब्ध रस्ते

१) संपूर्ण सेनापती बापट मार्ग, दादर
२) इंडिया बुल फायनांन्स सेंटर (PPL)
३) कोहिनूर स्क्वेअर कंपाऊंड, शिवाजी पार्क, दादर
४) कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग,
५) इंडिया बुल्स सेंटर, ज्युपीटर मिल कंपाऊंड, एलफिस्टन (PPL)
६) पाच गार्डन, आर.ए.के. ४ रोड

हे ही वाचा : 

विधवा महिलांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख करावा, मंगलप्रभात लोढा यांच्या सचिवांना सूचना

भारताची प्रगती आपण सर्व धर्मनिरपेक्ष विचाराने आजपर्यंत करत…, जयंत पाटील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss