spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Dr. B.R. Ambedkar जयंतीच्या मिरवणुकीत दोघांचा मृत्यू, विरारमधील मोठी दुर्घटना

आज दिनांक १४ एप्रिल रोजी सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr. B.R. Ambedkar Jayanti) साजरी केली जात आहे.

आज दिनांक १४ एप्रिल रोजी सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr. B.R. Ambedkar Jayanti) साजरी केली जात आहे. काल पूर्व संध्येला विरारमध्ये एक मिरवणूक एक मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली आहे. या मिरवणुकीत इलेक्ट्रिक वायरला झेंड्याचा स्पर्श झाल्यानं स्फोट झाला. या स्फोटात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

काल विरारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिम्मित मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीदरम्यान इलेक्ट्रिक वायरला झेंड्याचा स्पर्श झाल्यानं स्फोट झाला. यामध्ये २ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर यामध्ये ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. विरार पूर्व मधील कारगिल नगरमध्ये ही घटना घडली आहे. जखमींवर मुंबईच्या (Mumbai) कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुपेश सुर्वे ( वय ३०), सुमित सुध (वय २३) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. तर स्मित कांबळे (वय ३२) सत्यनारायण पंडित (वय २३), उमेश कानोजिया (वय १८ ), राहुल जगताप (वय १८) रोहीत गायकवाड अशी जखमींची नावे आहेत.

विरार पूर्व येथील कारगिल नगरमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री १०. ३० वाजता ही मिरवणूक संपल्यानंतर परत जात असताना हात गाड्यावर लावलेला लोखंडी झेंड्याचा रस्त्याच्या बाजूच्या विजेच्या ट्रान्सफर्माला स्पर्श झाला. त्यामुळं स्फोट होऊन ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये सहा जण गंभीर भाजले असून, यातील दोन जणांचा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर उत्साह पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रॅली काढून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देखील करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : 

आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करायला येणाऱ्या अनुयायांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईच्या वाहतुकीत पुढील बदल

आमचा ठाकरें गटाच्या शिवसैनिकांवर राग नाही – प्रवक्ते नरेश म्हस्के

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss