spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाण्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिवादन

Ekanath Shinde : समता, बंधुता, एकता अशी अनेक मुल्य जगभरात रुजविण्यासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केले अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti 2023) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी ठाणे शहरातील कोर्ट नाका आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरपूर्वक वंदन केले.

Ekanath Shinde : समता, बंधुता, एकता अशी अनेक मुल्य जगभरात रुजविण्यासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केले अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti 2023) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी ठाणे शहरातील कोर्ट नाका आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरपूर्वक वंदन केले. यावेळी मा.आमदार रविंद्र फाटक, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव, नम्रता फाटक, पूजा वाघ, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भीमसैनिक आवर्जून उपस्थित होते.

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वरात्री दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. तर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन केल्यानंतर दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन आंबेडकरांच्या समाधी स्थळाला अभिवादन केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी संपूर्ण देशभरातून लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर जमतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवश्यक निर्देश दिले. तसेच आगामी ३ दिवस रात्री वांद्रे वरळी सी लिंक वरील विद्युत रोषणाई सुरू ठेवण्याचे निर्देश एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईचे कार्यक्रम आटपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल झाले आहेत. आंबेडकर जयंती निमित्त ठाण्यात आयोजित विविध मंडळांना मुख्यमंत्री भेट देणार आहेत.

हे ही वाचा : 

डोळ्याखालील Dark Circle ची समस्या दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय | home remedies | Eyes

ठाकरेंचा सध्या दार खटखटवण्याचा कार्यक्रम सुरू आहे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss