spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपयांचं धनादेश केला परत

महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२ या कार्यक्रमासाठी लाखोने उपस्तित असणाऱ्या बंधू भगिनींना वंदन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. आणि त्यांच्या उपस्थित मला पुरस्कार दिला त्याबद्दल मी आभारी आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२ या कार्यक्रमासाठी लाखोने उपस्तित असणाऱ्या बंधू भगिनींना वंदन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. आणि त्यांच्या उपस्थित मला पुरस्कार दिला त्याबद्दल मी आभारी आहे. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार एका घरात पुन्हा देणं हि खूप सौभाग्याची गोष्ट आहे. महाराष्ट्रात आणि इतर कोणत्याही राज्यात असा झालं नसेल. तसेच कार्यक्रमासाठी व्यासपीठावर बसलेल्या बड्या नेत्यांचे आभार मानतो फक्त केवळ माझ्या कार्यक्रमाचे औचित्य साधून वेळेत वेळ काढून उपस्थित राहील त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानतो.

नानांनी हे काम १९४३ पासून सुरू केलं. तेव्हा आधी खेडेगावापासून सुरूवात केली. लोक सांगायचे शहरात जा. पण नाना म्हणायचे शहरात जायची गरज नाहीये. खेडेगावातल्या लोकांच्या अंधश्रद्धा, वागणूक याला वळण लागलं पाहिजे, अंत:करणात सुविचार ठेवून प्रत्येकाला वागणूक करता आली पाहिजे असा विचार होता. त्यामुळे आपण खेडेगावापासून सुरूवात केली”, असं ते म्हणाले. खेडोपाड्यातून अप्पासाहेब धर्माधिकारी त्यांच्या समाजकार्याला सुरवात केली. प्रसिद्धी साठी कोणतेच काम करू नये. प्रसिद्धी आपल्या कामातून दिसून येते आणि त्याची देखल सुद्धा केली जाते. माझ्या श्वासोच्छ्वास चालू असे पर्यंत मी काम करत नाही. कर चांगले तर देह उत्तम असतो. मला मिळालेल्या सन्मान हा तुमच्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करतो. कोणताही सन्मान हा आपल्या वाऱ्यामुळे मिळते. दरम्यान, आपण प्रसिद्धीपासून लांबच राहातो, असं आप्पासाहेब यावेळी म्हणाले. “कोणत्याही प्रकारची जाहिरात नाही, गवगवा नाही. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. प्रसिद्धीमधून काहीही साध्य होत नसतं. महत्त्वाच्या गोष्टीची जाहिरात करायची गरज काय? पण जाहिरात करणाऱ्यांसंदर्भात माझा राग नाही. मानवता धर्म श्रेष्ठ आहे. तो प्रत्येकाच्या मनात रुजू व्हायला हवा. त्यासाठीच आमचा हा खटाटोप आहे. नानासाहेबांनी ८७ वर्षांपर्यंत काम केलं आहे. आता जिवात जीव असेपर्यंत, श्वास चालेपर्यंत हे काम मी चालू ठेवणार आहे. माझ्यानंतर उत्तराधिकारी म्हणून सचिनदा धर्माधिकारी तुम्हाला परिचित आहेत. तोही हे कार्य अखंडपणे करणार आहे. कार्य चालू राहातं. कार्य श्रेष्ठ आहे. कार्य उत्तम असेल, तर देहाला सन्मान मिळत असतो”, असं आप्पासाहेब धर्माधिकारी यावेळी म्हणाले. आपण देशाच्या , आईवडिलांचे आणि समाजाच्या ऋणी राहून आपण समाजाची सेवा करायला पाहिजे. देशासोबत समाजसेवेची सेवा हि व्यासपीठावरून बड्या नेत्यांची केली जाते.

अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्थापन केले त्यातून आम्ही वृक्षारोपण करण्याचे कार्य सुरु केले. ऊर्जा घेण्यासाठी वृक्ष रोपं करून झाड लावून त्याची पुढे देखभाल केली पाहिजे. लहान मुलाची जशी आपण काळजी घेतो आणि नंतर त्याला सावरण्याची गरज लागत नाही त्यामुळे यावर्षी पावसाच्या सुरवातीला प्रत्यकाने ५ झाडे तरी लावली पाहिजे. त्यामुळे तुम्ही संकल्प करा देशाला त्याच्यामुळे निसर्ग संवर्धन करू शकतो. हि सुद्धा समाजकार्य आहे. आरोग्य सुदृढ राहावं म्हणून आरोग्य शिबिरे ठेवली पाहिजे. रक्तदान शिबिराचे आयोजन करावं जेणेकरून रक्ताची कमतरता होणार नाही आणि आपल्या मुले कोणाला तरी जीवनदान मिळू शकत. शरीरातल्या रक्तपेशी वाढल्या पाहिजे आणि त्यामुळे अंदाज कार्य घडत असते. सरकारी दाखले प्रत्येकापर्यंत पोहोचावे हे महत्वाचे असते कारण याचा लाभ प्रत्येक नागरिकाला होत असतो. पाणपोई बांधायची गरज आहे कारण पाणी हे जीवनाला खूप महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाणपोई उभारण्याचे काम स्वतःकरून केले पाहिजे. तरुण वर्गाला रोजगाराच्या संधी आपण या मार्फत देऊ शकतो.

सामाजिक काम करणे हे स्वतःहून घडायला पाहिजे. प्रत्येकाने केलेल्या मदतीमुळे समाजकार्य घडत असत. आपण आपल्या पासून सुरवात केली पाहिजे त्यामुळे समाजात प्रबोधन घडण्याचे कार्य आपल्या हातून घडत असते. “महाराष्ट्रभूषण पुरस्कार नानांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित आहे. कोणताही पुरस्कार उच्च असतो. आज समाजाचे, देशाचे ऋण आपल्यावर आहेत. ते फेडण्यासाठी आपण काय केलंय? आपण त्यांची काय सेवा केली? हे फार महत्त्वाचं आहे. समाजाची सेवा करण्यासाठी काय करावं लागतं? हेच आम्ही सांगत असतो. प्रत्येकानं अखंड सेवा करायला पाहिजे. फक्त बोलून होत नाही”, असंही आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी यावेळी नमूद केलं.

हे ही वाचा : 

या सोहळ्यांना मी इथे मुख्यमंत्री म्हणून आलो नाही – एकनाथ शिंदे

एकच परिवारात तीन पिढ्यांमध्ये समाजसेवेचा वारसा पहिल्यांदी बघितला – अमित शहा

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss