spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रथमेश परब ची ड्रीम गर्ल कोण ?

प्रथमेश परब ने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार नुसार प्रथमेश परब ने त्याच्या ड्रीम गर्ल विषयी सांगितले.

मुंबई : मला वेड लागले प्रेमाचे म्हणतं ज्याने प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाचे वेड लावले तो म्हणजे अभिनेता प्रथमेश परब. प्रथमेश परब याआधी “बालक पालक”, “टाईमपास” , “उर्फी”, “टकाटक” या सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण सगळ्यात जास्तत्याच्या ‘दगडू’ या भूमिकेवर प्रेक्षकांनी अगदी भरभरून प्रेम केलं. हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’ म्हणणारा प्रथमेशपुन्हा एकदा वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. नुकतंच त्याने त्याच्या ड्रीम गर्लबद्दल खुलासा केला आहे.

प्रथमेश परब चा टाईपास 3 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये प्रथमेश परब आणि ऋता दुर्गुळे हि नवीकोरी जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागात बालपणी एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्याभागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट आता टाइमपास ३ मधून प्रेक्षकांच्याभेटीला येत आहे.

प्रथमेश परब ने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार नुसार प्रथमेश परब ने त्याच्या ड्रीम गर्ल विषयी सांगितले. तो सध्या माझी ड्रीमगर्ल अभिनेत्री आलिया भट्ट आहे. आतापर्यंत तिच्यासारखी अभिनेत्री पाहिलेली नाही. ती प्रत्येक चित्रपटात नव्याने समोर येते.” मलातिच्याविषयी फार आदर आहे. मला आलिया भट्टसोबत काम करण्याची फार इच्छा आहे. जर भविष्यात तशी संधी मिळाली तर मी तीकधीच नाकारणार नाही”, असेही प्रथमेश परबने म्हटले. प्रथमेश ने याआधी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. प्रथमेश आणि ऋताच्या येणाऱ्या टाईमपास सिनेमासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Latest Posts

Don't Miss