spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मध्य रेल्वेने भंगारातून कमावले तब्बल ४८३.२९ कोटी रुपये

Indian Railways : मध्य रेल्वेचा आर्थिक वर्ष २०२२-२३ (एप्रिल - मार्च) मध्ये भंगार महसूल रु. ४८३.२९ कोटी हा आतापर्यंतचा सर्वाधिक

Indian Railways : भारतीय रेल्वेचे जाळे देशभरात मोठ्या प्रमाणात पसरलेले पाहायला मिळते. प्रवासाचे सोयीस्कर साधन म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्याही दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. यातून रेल्वेची कमाई (Indian Railway Income) तर वाढत आहेच सोबतच भारतीय रेल्वेने केवळ भंगार विकून कोट्यावधी रुपयांची जबरदस्त कमाई केली आहे. मध्य रेल्वेने सर्व स्थानके, विभाग, प्रतिष्ठाने, डेपो, कार्यशाळा, शेड, सर्व रेल्वे स्थाने/विभाग भंगारमुक्त करण्यासाठी “झिरो स्क्रॅप मिशन” साध्य करण्यासाठी आपले अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

आर्थिक वर्ष २०२२-२३ (एप्रिल ते मार्च) (financial year 2022-23) दरम्यान, मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून रु. ४८३.२९ कोटी मिळवले आहेत. एप्रिल ते मार्च या कालावधीत मध्य रेल्वेने केलेली ही सर्वाधिक भंगार विक्री आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीच्या लक्ष्य रु.३५५ कोटींच्या तुलनेत हा भंगार महसूल ३६.१४% अधिक आहे.

 

भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसूलच नाही तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यास मदत झाली आहे. मध्य रेल्वे, रेल्वेतील विविध ठिकाणी सर्व निवडलेल्या स्क्रॅप सामग्रीची विक्री करण्यासाठी मिशन मोडमध्ये कार्यरत आहे. रेल्वे विभाग भंगार विक्री केवळ महसूल निर्माण करण्यातच मदत करत नाही तर यामुळे संबंधित परिसराची देखरेख चांगल्या प्रकारे होते. रेल्वेतील विविध ठिकाणी असलेले व निवडण्यात आलेले सर्व भंगार साहित्य विकण्यासाठी मध्य रेल्वे मिशन मोडमध्ये काम करत आहे.

हे ही वाचा : 

Sharad Pawar Live, राजकीय चर्चांवर अखेर शरद पवारांनी दिले स्पष्टीकरण, कुठलीही बैठक ही…

महाराष्ट्राच्या राजकारणात आता दुसरा भूकंप? धाकट्या पवारांकडे ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार?

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss