spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई महानगरपालिकेचा निर्णय इतर मनपांना लागू होणार आहे का?

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळामधील बृहन्मुंबई महापालिकेची (Brihanmumbai Municipal Corporation) प्रभाग संख्या वाढवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळामधील बृहन्मुंबई महापालिकेची (Brihanmumbai Municipal Corporation) प्रभाग संख्या वाढवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. पूर्वरत प्रभाग रचना करण्याच्या राज्य सरकारच्या नव्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने नव्याने दिलेले आव्हान फेटाळून लावण्यात आले आहे. त्यामुळे हा निर्णय राज्यामधील निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व महानगरपालिकांना लागू होणार की नाही? याकडे निवडणूक आयोगाचे आता लक्ष आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबत आठवडाभरामध्ये निर्णय घेतला जाणार आहे. राज्यमध्ये कोरोना महामारी त्याचबरोबर राजकीय खेळखंडोब्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे हा सर्व निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे.

कोल्हापूरच्या महानगरपालीमध्येही ८१ सदस्यांसाठी पुन्हा प्रभाग पद्धती नव्याने करावी लागणार आहेत. एक प्रभाग तीन ते चार नगरसेवकांचा असणार आहे त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे. या दोन निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मनपा निवडणुकांवर शिक्कामोर्तब होणार आहे. कोल्हापूरची मनपाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० रोजी संपली आहे. तेव्हापासून आजपर्यत कोल्हापूर मनपा निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार डिसेंबर २०२० मध्ये निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी एक सदस्य प्रभाग रचना आणि ८१ नगरसेवक संख्या यानुसार प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. प्रभाग रचना, आरक्षण सोडत तसेच मतदारयादी काम पूर्ण झाले होते. परंतु मार्च २०२१ मध्ये कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.

महाविकास आघाडी सरकारने सप्टेंबर २०२१ मध्ये बहुसदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. प्रभाग रचना करण्याची आदेश महापालिकेला दिले जाते. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी कोल्हापूर शहरातील ८१ प्रभागाची प्रत्येकी तीन नागरसेवनकांचा एक असे २७ प्रभाग निश्चित करण्यात आले आहे. प्रभाग रचना जाहीर करून आरक्षण सोडते. पुन्हा निवडणूक प्रक्रियेला स्थागिती देण्यात आली आहे. चार सदस्यांचा एक प्रभाग झाल्यास चार सदस्य २० प्रभाग तर एक सदस्य असलेला एक प्रभाग होऊ शकतो त्यासाठी कॉमन तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. कारण यासाठी पूर्णतः नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

हे ही वाचा : 

संजय राऊत आणि अजित पवारांमध्ये वाढले मतभेद

नितेश राणे आणि संग्राम जगताप आमने-सामने

महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरम्यान चेंगराचेंगरी ? जितेंद्र आव्हाड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss