spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Yemen च्या राजधानीमध्ये पैसे वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, ७९ नागरिकांचा मृत्यू

रमजान (Ramadan 2023) उत्साहावर विरजण घालणारी बातमी यमनमधून समोर येत आहे. यमनची (Yemen) राजधानी साना येथे जकात वाटण्याच्या कार्यक्रमा चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली आहे.

रमजान (Ramadan 2023) उत्साहावर विरजण घालणारी बातमी यमनमधून समोर येत आहे. यमनची (Yemen) राजधानी साना येथे जकात वाटण्याच्या कार्यक्रमा चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत किमान तब्बल ७८ लोक मरण पावले आहेत. तर ३२२ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सानामध्ये नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापाऱ्यांकडून नागरिकांना पैशांचं वाटप केलं जात होतं. मात्र, यावेळी प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. यात ७८ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

 हुती बंडखोर संचलित गृहमंत्रालयाने याबाबतची ही माहिती दिली. राजधानी सानाच्या जुन्या शहरात ही घटना घडली. व्यापाऱ्यांनी गरीब लोकांना आर्थिक मदत मिळाली म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. मात्र, या कार्यक्रमाचं व्यवस्थित नियोजन करण्यात आलं नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं बंडखोरांचे ब्रिगेडियर अब्देल खलीक अल अघरी यांनी सांगितलं.

 रमजानच्या पवित्र महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये व्यापार्‍यांकडून धर्मादाय देणग्यांचे वितरण करताना चेंगराचेंगरी झाली, असे हुथी-नियंत्रित गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे, रॉयटर्सने अहवालात नमूद केले आहे. अहवालात नमूद केले आहे की देणग्या घेण्यासाठी शेकडो लोकांनी शाळेत गर्दी केली होती, ज्याची रक्कम ५,००० येमेनी रियाल किंवा प्रति व्यक्ती सुमारे $ 9 होती. रॉयटर्सच्या हवाल्याने अंतर्गत मंत्रालयाने जोडले की देणगी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जबाबदार असलेल्या दोन व्यापाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते आणि त्यांची चौकशी सुरू होती.

हे ही वाचा : 

मुंबई मेट्रो प्राधिकरणाला सुप्रीम कोर्टाने झापले, १० लाखांचा दंड

Eid-ul-Fitr 2023, भारतात ईद-उल-फित्र कधी साजरी होईल, ईदची नेमकी तारीख आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss