spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री पदाने कितीदा केलंअजित दादांना निराश, पवाराचं स्वप्न सत्यात उतरेल?

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. अजितदादांची नाराजी आणि अजित दादांचं बंड हे काय नवीन नाही. आतापर्यंत अजित पवार यांनी तब्बल चार वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला आहे

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. अजितदादांची नाराजी आणि अजित दादांचं बंड हे काय नवीन नाही. आतापर्यंत अजित पवार यांनी तब्बल चार वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला आहे. परंतु त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा ही काही आजवर लपून राहिलेली नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य प्राप्त केलेले अजित पवार राज्यातील नंबर एकचे आमदार आहेत. बारामती हा पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच बारामतीतून अजित दादा विधानसभेवर निवडून जात असतात.

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीचा श्री गणेशा केला होता. १९९९ च्या दशकात अजित दादा प्रथमच कॅबिनेट मंत्रीच्या खुर्चीत जाऊन बसले त्यावेळेस त्यांच्याकडे पोटबंधारे आणि फलोउत्पादन खाती होती. पुढे जाऊन २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्त जागा मिळूनही उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं होत. तेथेच अजित पवारांची पहिली नाराजी सगळ्यांसमोर आली. त्यानंतर अजित दादांनी “२००४ मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही राष्ट्रवादीची सगळ्यात मोठी चूक होती” असं कित्येकदा बोलून दाखवलं.

नंतरच्या काळात २००८ मध्ये उपमुख्यमंत्री पदापासून अजित पवारांना बाजूला ठेऊन त्या ठिकाणी छगन भुजबळांची वर्णी लागली. तेव्हाही अजितदादांची नाराजी सगळ्यांच्या समोर आली होती. २०१० मध्ये आदर्श घोटाळा सगळ्यांच्या समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असणाऱ्या छगन भुजबळ यांनाही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार संभाळायला होता.

पुढे जाऊन २००९ मध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राजकारणात पदार्पण केले आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून त्या खासदार झाल्या. सुप्रिया ताईंच्या राजकारणात येण्याने शरद पवारांचा खरा वारसदार अजित दादा नसून सुप्रिया सुळेच आहेत अशी चर्चा सुरू झाली आणि ती आजवर सुरूच आहे.

नंतरच्या काळात २०१२ मध्ये अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. या आरोपानंतर अजित दादांना राजीनामा द्यावा लागला होता. परंतु काही महिन्यातच पुन्हा एकदा ते उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले होते. पुढे २०१९ मध्ये पवारांची तिसऱ्या पिढीतील पार्थ पवार आणि रोहित पवार सक्रिय राजकारणात आपलं नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले. परंतु यात विधानसभा निवडणूक लढवण्यात रोहित पवारांना यश आले तर पार्थ पवारांच्या हाथी अपयश आले. पार्थ पवारांच्या पराभवानंतर अजित दादा हे नाराज असल्याची चर्चा होत होती.

२०१९ मध्ये अजित पवारांची नाराजी पहाटेच्या शपथविधीनंतर जाहीरपणे सगळ्यांच्या समोर आली. अजित दादांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी अटकून महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळाच भूकंप केला होता. परंतु नंतर शरद पवारांच्या हस्तक्षेपानंतर अजितदादा परतले व शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच सरकार म्हणजेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यामध्ये अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाताळली.

सध्या २०२३ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच राजकीय उलटा पालक घडत असताना अजित दादा भाजपला साथ देणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उदान आलंय. अजितदादा भाजपसोबत गेले तर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल अशाही चर्चा एकीकडे रंगत आहेत. २००४ पासून ते अगदी २०२३ पर्यंत अजितदादांची नाराजी काही लपून राहिलेली नाही.

हे ही वाचा : 

खारघर दुर्घटनेत मृत पावलेले १४ पैकी १२ श्री सदस्य ७ तास होते उपाशी

स्ट्रिमिंग कंपनी नेटफ्लिक्सला फटका; ग्राहकांचं होणार नुकसान…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss