spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पाणी वाटप करताना पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीचे आदेश  

पाणी वाटप (Water Distribution) करताना पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याला (Drinking Water) प्राधान्य द्या, नंतरच इतर पाण्याचं योग्य ते वाटप करण्यात यावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासनाला दिले आहेत.

पाणी वाटप (Water Distribution) करताना पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याला (Drinking Water) प्राधान्य द्या, नंतरच इतर पाण्याचं योग्य ते वाटप करण्यात यावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासनाला दिले आहेत. महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये ५८.७७ टक्के पाणीसाठा आहे. तर मागील वर्षी याच दिवशी ५५. १२ टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षाच्या तुलनेत आज जरी तीन टक्के पाणीसाठा जास्त झाला असला तरी यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे त्यामुळे दुष्काळाच्या झळा पोहचू शकतात. आणि म्हणूनच आत्तापासूनच पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश सरकारने प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणत्याही प्रकारचा त्रास हुनर नाही म्हणून हि घाऊक स्वरूपात केलेली उपाययोजना आहे.

एकंदर सध्या राज्यातल्या जलाशयांमधील पाण्याची परिस्थिती पाहता अमरावती विभागट आज ६१.४७% पाणीसाठा असून मागील वर्षी ५५.२३ % या दिवशी पाणीसाठा होता. औरंगाबाद विभाग ७२. ०७टक्के पाणीसाठा तर मागील वर्षी याच दिवशी ५९. ४९% पाणीसाठा इतका होता. कोकण विभागात आज ६६. १२ % पाणीसाठा आहे तर मागील वर्षी याच दिवशी ५३. ०२% पाणीसाठा, नागपूर विभागआज ६७.०१% पाणीसाठा आहे तर मागील वर्ष ४२. ७९% पाणीसाठा,नाशिक विभाग आज ७०.६९% पाणीसाठा आहे मागील वर्षी ४८. ०२% पाणीसाठा होता, पुणे विभाग आज ४२.७५ % पाणीसाठा असून मागील वर्षी याच दिवशी ५९. ७३ % पाणीसाठा होता. राज्यात सध्या पाण्यासाठी टँकर सध्या राज्यात १०४ गावं आणि २७२ वाड्यांना ७४ टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. कोकण विभागात सर्वाधिक ७८ टँकर सुरु आहेत. नाशिक विभागात ४ टँकर, पुणे विभागात ४ टँकर, अमरावती विभागात ८ टँकर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या दुष्काळामध्ये मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसलेला होता. मात्र यावर्षी औरंगाबाद विभागात अद्याप एकही टँकर सुरु झालेला नाही.

जलयुक्त शिवार योजना आणि इतर योजना तात्काळ सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील मोठ्या सात धरणांचा गाळ उपसून खोलीकरण करण्याचेही आदेश सरकारने प्रशासनाला दिले आहेत. देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस, भारतीय हवामान विभागाचा अंदाज यावर्षी देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस (Rain) होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) दिली आहे. देशात यंदा सामान्य पाऊस राहणार आहे. आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. यंदा देशात ८७० मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार आहे. तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा हवामान विभागाचा दीर्घकालीन अंदाज आहे.

हे ही वाचा : 

संजय राऊतांबद्दल प्रश्न विचारला असता अजित पवारांनी काढले असे उदगार…

संजय राऊत यांच्याकडून खारघर दुर्घटनेप्रकरणी २ दिवसाचं अधिवेशन घेण्याची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss