spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उदय सामंत गेले शरद पवारांच्या भेटीला

राज्यात सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे मार्गदर्शन शिबीर पार पडणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे.

राज्यात सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे मार्गदर्शन शिबीर पार पडणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर पोहोचले आहेत. आता उदय सामंत हे शरद पवारांच्या भेटीला का गेले असतील असा प्रश्न पूर्ण राजकारणात धुमाकूळ घालत नाही. अनेक नेत्यांकडून तर्क – वितरकांना उधाण आले आहे.

अदानी यांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी उदय सामंत हे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.अदानीची भेट घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी उदय सामंत यांनी देखील भेट घेतली असल्यामुळे शरद पवार नवीन काय राजकारणात पेज निर्माण कर आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दोघांच्यात भेटीत चर्चा काय घडली? नाट्य परिषदेच्या निवडणुकीबद्ल सामंत यांनी पवारांची भेट घेतली असल्याचे सांगतिले. यावेळी नाट्य परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. इतर कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. असही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं.दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व मंत्र्यांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सर्व मंत्री मुंबईच्या दिशेने रवाना जाले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या घाटकोपरमध्ये ‘कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर २०२३’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला राज्यभरातून दोन हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

हे ही वाचा : 

राहुल गांधींच्या नव्या वक्तव्यामुळे फुटलं नव्या वादाला तोंड

पाणी वाटप करताना पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीचे आदेश  

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss