Wednesday, September 25, 2024

Latest Posts

आंदोलनकर्त्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अटक

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचा मुलगा राहुल गांधी आणि मुलगी प्रियांका गांधी वड्रा यांच्यासोबत आज दुपारी ईडीच्या दिल्ली कार्यालयात दाखल झाल्या. या चौकशी विरोधात काँग्रेसच्या वतीने देशाची राजधानी दिल्लीसह इतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे. या सर्वामध्ये पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या नंतर रस्त्यावर केवळ राहुल गांधी एकटेच बसले होते. काही वेळानी पोलिसांनी राहुल गांधी यांना देखील ताब्यात घेतले आहे. सोनिया गांधींच्या ईडी चौकशीला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढ़ी, केसी वेणुगोपाल, दीपेंद्र हुडा यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राहुल गांधी यांनी संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत काँग्रेस खासदारांचा मोर्चा नेला. इतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनीही निदर्शने केली आणि घोषणाबाजी केली. आसाममधील अनेक जण विधानसभेच्या इमारतीबाहेर जमले आणि आज सोनिया गांधी यांची ईडी चौकशी संपेपर्यंत ते तिथेच राहू, असे सांगितले.

हेही वाचा : 

ठाकरेंना शिवसेनेपासून दूर करण्याचा हा त्यांचा कट आहे; उद्धव ठाकरे

केंद्रीय तपास एजन्सीने गेल्या आठवड्यात शुक्रवारी नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या तपासात सोमवारपर्यंत सामील होण्यासाठी काँग्रेस प्रमुखांना नवीन समन्स बजावले. नंतर ते एका दिवसाने पुढे ढकलण्यात आले. भाजप-शासित केंद्र सरकारवर सूडाचे राजकारण केल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या तीव्र निषेधादरम्यान, ईडीने गुरुवारी सुमारे दोन तास चौकशी केली. तर गेल्या महिन्यात जूनमध्ये राहुल गांधी यांची जवळपास 50 तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळीदेखील काँग्रेसने सलग 5 दिवस निदर्शने केली होती.

सुपरस्टार रजनीकांत बनले तामिळनाडूतील सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी

Latest Posts

Don't Miss