spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विखे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात जाऊन मंगळसूत्र बांधावं – संजय राऊत

Sanjay Raut On  Radhakrishna Vikhe Patil : राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात येऊन दहा महिन्यांचा काळ पूर्ण होतं आला आहे. आमदारांची सख्या कमी असतानाही युतीत शिवसेना शिंदे गट मोठ्या भावाच्या भूमिकेत जाऊन बसल्याने अनेक भाजप नेत्यानीं आपली खंत जाहीरपणे व्यक्त केलेली पाहायला मिळाली.

Sanjay Raut On  Radhakrishna Vikhe Patil : राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात येऊन दहा महिन्यांचा काळ पूर्ण होतं आला आहे. आमदारांची सख्या कमी असतानाही युतीत शिवसेना शिंदे गट मोठ्या भावाच्या भूमिकेत जाऊन बसल्याने अनेक भाजप नेत्यानीं आपली खंत जाहीरपणे व्यक्त केलेली पाहायला मिळाली. पहिले चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असल्याच बोलून दाखवलं होतं तर आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) आपल्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) असल्याचेच म्हंटल आहे. त्यामुळे भाजप आमदारांमध्ये शिंदे फडणवीस सरकार विषयी असणारा असंतोष उघड झाला आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लावला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत या वक्तव्याबाबत राऊत यांना विचारले असता ” मुख्यमंत्री पदावर त्यांना बसवा, कोणी थांबवला आहे तुम्हाला? जर तुमच्या मनात कोणी वेगळं असेल आणि तुम्ही दुसऱ्यासोबत नांदत असाल तर हा व्यभीचर आहे. लग्नही एकाशी, वरलं एकाला आणि संसार एकाशी यासारखा व्यभिचार नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात जाऊन मंगळसूत्र बांधाव. आम्ही कुठे थांबवल आहे, आम्हालाही ते चालतील. असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यावर चांगलीच टोलेबाजी केली आहे. संजय राऊत सध्या जळगाव येथे असून आज पाचोऱ्यात होणाऱ्या सभा स्थळाचा त्यांनी आढावा घेतला. दरम्यान पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.

हे ही वाचा : 

अवघ्या काही तासांत पाचोऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

MPSC च्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सोशल मिडियावर व्हायरल, ३० एप्रिल पासून MPSC च्या परीक्षा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss