गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणारा अनेक घडामोडी या घडत आहेत. भावी मुख्यमंत्री कोण होणार याच्या अनेक चर्चा या रंगत आहेत. अनेक दिसावं भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत होत. तसेच त्या संदर्भात अनेक बॅनर्स देखील अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. अजित पवरांनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
अजित पवारानंतर आता नागपूर मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख करण्यात आला आहे. या संदर्भात बॅनर देखील झळकले आहेत. भाजपचे पदाधिकारी बबलू गौतम यांनी हा बॅनर लावला आहे.राज्याच्या राजकारणात भावी मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू असतांना नागपूर येथे लावण्यात आलेले फलक चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चा सुरू असतांना राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे.
बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी हा बॅनर लावला आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात हे आहे तेच आम्ही लावले आहे. २०१९ ला जनतेने देवेंद्र फडणवीस यांना बहुमत दिले होते. उद्धव ठाकरे यांना बहुमत दिले नव्हते असेही बबलू गौतम यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस हे भावी मुख्यमंत्री असल्याचा दावा केला आहे. खरंतर भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे आत्तापर्यन्त बॅनर झळकले आहेत त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा :
Baloch चित्रपटाच्या ट्रेलर निम्मित Smita Gondkar सोबत खास गप्पा
Actress पुनम इतकीच पलोमा आहे ग्लॅमरस and स्टायलिश