spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

५५ वर्षांवरील पोलिसांना उन्हात नो ड्युटी, पोलीस खात्याचा महत्वपूर्ण निर्णय

Mumbai Traffic Police : ऊन, वार, आणि पाऊस या साऱ्यांचा सामना करत जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर असणारे सोबतच शहरात आणि राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पोलीस (Police) बांधव यांच्यासाठी पोलीस खात्याकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai Traffic Police : ऊन, वार, आणि पाऊस या साऱ्यांचा सामना करत जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर असणारे सोबतच शहरात आणि राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पोलीस (Police) बांधव यांच्यासाठी पोलीस खात्याकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या उष्माघाताचे प्रमाण अधिकच वाढले आहे. अशातच नागरिक आणि सर्वच प्रकारच्या यंत्रणांच्या सेवेत कायम तत्पर असणाऱ्या पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जाणं हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. याच गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस खात्यात सह वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या पोलिसांना वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलिसांसाठीच्या सूचना काय आहेत?

  • पोलिसांनी टोपीचा वापर करावा
  • चक्कर येणं किंवा छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाल्यास तात्काळ रुग्णालयात जाणं
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांनी On Duty असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा आढावा घ्यावा.
  • वाहतुक कोंडीच्या ठिकाणी तरुणी आणि सशक्त पोलिसांची नियुक्ती करावी.
  • दुपारच्या वेळेत ड्युटी असल्यास तिथं पोलिसांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करणं.

या जीवघेण्या उष्माघाताचा फटका फिल्डवर काम करणाऱ्या कोणत्याच पोलीस कर्मचाऱ्याला बसू नये यासाठी वाहतूक विभागाने महत्वाची पावले उचलायला सुरुवात केली आहे. सध्याच्या परिस्थितीत ५५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या पोलीस बांधवांना फिल्ड वर्क न देता कार्यालयीन कामकाज देण्याचा निर्णय पोलीस खात्याकडून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर रक्तदाब, दमा, मधुमेह आणि या सोबतच इतर वेळी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही १२ ते ०५ या वेळेत कार्यकालीन कामकाज देण्यात येणार आहे. भर उन्हामध्ये उभे राहून वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या पोलिसांचे हित आणि त्यांच आरोग्य केंद्रस्थानी ठेवत पोलीस खात्याकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीचा शिंदेच्या शिवसेनेला रामराम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावातून धूर निघतोय संजय राऊत यांचा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss