spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पंतप्रधानांच्या आईचे १०० व्या वर्षात पदार्पण, या वयात करतात…

हिराबेन मोदी या त्यांच्या लहान मुलासोबत म्हणजेच पंकज मोदी सोबत अनेक वर्षे गांधी नगर येथे राहतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या आईचा 18 जून ला शंभरावा वाढदिवस आहे. या निमित्ताने नरेंद्र मोदी यांनी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. वयाची शंभर वर्षे गाठली ही चर्चा सध्या अनेकांना मध्ये होत असून नरेंद्र मोदींच्या आईचे म्हणजेच हिराबेन यांचे देखील कौतुक होत आहे. शंभराव्या वर्षात हिराबेन यांचं स्वास्थ्य कसं असेल?  हा प्रश्न अनेकांना पडत आहे. तर हिराबेन त्यांच्या रोजच्या आहारात काय घेतात हे आम्हीं तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.
हिराबेन मोदी या त्यांच्या लहान मुलासोबत म्हणजेच पंकज मोदी सोबत अनेक वर्षे गांधी नगर येथे राहतात. हिराबेन आजही स्वतःची कामं स्वतः करत असून त्या आजही कोणाचीही मदत न घेता व्यवस्थित चालत फिरत असतात. हिराबेन जास्तीत जास्त घरचा आहार खाणं पसंद करतात. खिचडी, वरण-भात आणि गोडात लापशी असं पौष्टिक आहार खाणं त्यांना आवडतं.
नरेंद्र मोदी जेव्हा आईला भेटतात तेव्हा हिरबेन स्वतः त्यांना त्यांच्या हाताने जेवण भरवत असते या क्षणाचे अनेक फोटोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. अहमदाबाद येथील आहारतज्ञाच्या हेतूने हिराबेन यांचं स्वास्थ इतर लोकांपेक्षा जास्त उत्तम आहे. उत्तम स्वास्थ असणाऱ्या हिराबेन ने समाजासमोर उत्तम उदाहरण ठेवलं आहे.

Latest Posts

Don't Miss