spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कर्नाटक निवडणुकांचा रणसंग्राम; पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित

कर्नाटक निवडणुकांचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने भाजपतर्फे एकही संधी सोडली जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहा दिवसाच्या या दौऱ्यात प्रचारासाठी भाजपच्या बड्या प्रचारकाची फौज उतरणार आहे.

कर्नाटक निवडणुकांचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने भाजपतर्फे एकही संधी सोडली जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहा दिवसाच्या या दौऱ्यात प्रचारासाठी भाजपच्या बड्या प्रचारकाची फौज उतरणार आहे. आपल्या प्रत्येक दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन रॅलींना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी उतरल्यामुळे मोठा प्रभाव पडणार आहेत. जेथे पक्षाचा जनाधार कमी आहे, अशा मतदारसंघांवर विशेष भर देण्यात येणार आहे. दिग्गजांची मोठी फौज प्रचाराच्या मैदानात भाजपने उतरवली जात आहेत. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी सहा दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहा दिवसांच्या या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ सभांना उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कर्नाटक दौरा हा २९ एप्रिल – हुमनाबाद, विजयपुरास कुडची आणि बंगळूरूच्या उत्तर भागात रॅलींना उपस्थित राहणार आहेत. तर 30 एप्रिल कोलार, चन्नपट्टना आणि बेलूर त्यानंतर २ मे चित्रदुर्ग, विजयनगरा, सिंधानपूर आणि कलबुर्गी, 3 मे मुदाबिद्री, करवार आणि किट्टूर येथे सभा घेणार आहेत. त्यानंतर ६ मे चित्तापूर, नंजांगुड, टुमकुरु ग्रामीण, बंगळूरूचा दक्षिण भाग, ७ मे प्रचाराचा शेवटचा दिवस चार रॅलींना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराचा ७ मे हा शेवटचा दिवस आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी चार सभांना संबोधित करणार आहेत. बदामी, हावेरी, शिवमोगा ग्रामीण आणि बंगळूरू सेंट्रल येथे रॅली होणार आहे.

कर्नाटकच्या निवडणुका लागल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार आहे . भाजपने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल ५४ बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे . कर्नाटक हे दक्षिणेतील एकमेव राज्य आहे ज्या ठिकाणी भाजपला आपले कमळ फुलवता आलं आहे. त्यामुळे दक्षिणेत पाय रोवायचे असतील तर कर्नाटकमध्ये सत्ता कायम ठेवण्याशिवाय भाजपला पर्याय नाही. त्यामुळे भाजपने या ठिकाणी लक्ष केंद्रीत केलं असून केंद्रीय नेतृत्वाने स्वतः या ठिकाणी लक्ष घातल्याची माहिती आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे नेते बीएस येडियुराप्पा यांनी नुकतंच सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.

हे ही वाचा : 

Jiah Khan आत्महत्या प्रकरणी CBI चे विशेष न्यायालय आज देणार निकाल

महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या प्रदर्शना बरोबरच केदार शिंदेच्या “बाईपण भारी देवा” या आगामी चित्रपटाचा टिझर झाला रीलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Latest Posts

Don't Miss