spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बारसू रिफायनरी प्रकल्पाला अजित पवार यांची भूमिका

बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन चांगलाच वाद चिघळलेला आपण गेल्या दिवसांपासून बघतच आलो आहोत. बघायला मिळत आहे. स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध होत असताना दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आंदोलकांच्या बाजूने उभा आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन चांगलाच वाद चिघळलेला आपण गेल्या दिवसांपासून बघतच आलो आहोत. बघायला मिळत आहे. स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध होत असताना दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आंदोलकांच्या बाजूने उभा आहे. या दरम्यान आज चांगलाच गदारोळ बघायला मिळाला. त्यानंतर आता अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.बारसू रिफायनरी प्रकल्पाचा वाद चिघळलेला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. “ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा पत्र दिलं आहे. आता उद्धव ठाकरेंनी आपण जनतेच्या सोबत आहे, असं म्हटलंय. प्रकल्पाचा जनतेचा विरोध असल्याने आपण विरोध करत असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे. ही त्यांची भूमिका आहे”, असं अजित पवार म्हणाले. “राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका विकासकामांच्या बाबतीत नेहमी पॉझिटिव्ह राहिली आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भूमिका ऐकली असेल. पण पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल तर प्रकल्पाचा फेरविचार व्हावा”, असं अजित पवार म्हणाले.

आमचं मत असं आहे की, आज प्रचंड महागाई आणि बेरोजगारी आहे. अशावेळेस काही प्रकल्प महाराष्ट्रापासून दूर गेलेले आपण पाहिले, ज्यातून काही लाख तरुण-तरुणींना रोजगार मिळणार होता. आता यातून रोजगार मिळून तिथे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नसतील, तिथे पिढ्यांपिढ्या तिथल्या वातावरणावर परिणाम होणार नसेल, तिथल्या निसर्ग सौंदर्यावर परिणाम होणार नसेल, तिथल्या फळांची शेतीवर परिणाम होणार नसेल…”, असं अजित पवार म्हणाले.काही जणांचा म्हणणं आहे की, तिथे स्थानिकांची संख्या कमी आहे. बाहेरचीच लोकं तिथे आलेली आहेत. त्याची शहानिशा केली पाहिजे. ज्यांच्या जमिनीवर प्रकल्प होणार आहे त्यांचा विरोध एकवेळ समजू शकतो. किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे तर आपल्या राज्याचं हित लक्षात घेऊन समजू शकतो”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

तसेच अजित पवार यांनी सांगितले की , माझ्या माहितीप्रमाणे काल उदय सामंत मला म्हणाले की, दादा एकही घर उठवलं जात नाहीय. एकही गाव उठवलं जात नाहीय. तिथे कुणाचं घर-गाव उठवलं जात नाहीय. मग आता प्रश्न आला की, ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, याबद्दल अशाही बातम्या ऐकायला मिळत आहेत की, परराज्यातील लोकांनी तिथे जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. याबद्दल शहानिशा करावी. स्थानिकांना फायदा होणार असेल तर तो स्थानिकांना व्हावा. नुकसान होणार असेल, पर्यावरणाचा ऱ्हास होणार असेल तर त्या प्रकल्पाच्या बाबतीत फेरविचार व्हावा”, असं अजित पवार म्हणाले.त्याचप्रमाणे उदय सामंत यांनी स्वत: येऊन शरद पवार यांना माहिती दिली. मी स्वत: कलेक्टरशी बोललो. तिथल्या एसपींशी बोललो. त्यांच्याकडून वेगळ्या पद्धतीने फिडबॅक मिळाला. काही लोकं तिथे झोपले आहेत, असं आपण पाहिलं”, असं अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा : 

“बारसू”मध्ये आंदोलकांवर कोणातही लाठीचार्ज झालेला नाही’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बारसू प्रकल्प जनतेची डोकी फोडून लादण्याचा प्रयत्न करु नका, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss