spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सोनम सोबत महिलेच्या वेशात दाढी मिशी वाला कोण ?

हल्लीच सोनमचा नुकताच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. सोनम ने तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम लंडन मध्ये साजरा केला. 

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे वेगवेगळ्या ड्रेसिंग स्टाईल चे फोटोज अनेक चाहत्यांना आवडतात. सोनम कपूर आता लवकरच आई होणार आहे. या अगोदर तिने तिच्या बेबी बंप चे फोटोज देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. हल्लीच सोनमचा नुकताच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. सोनम ने तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम लंडन मध्ये साजरा केला.
सोनम कपूर च्या डोहाळे जेवणाचे फोटोज आणि व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. फोटोत सोनम ने गुलाबी रंगाचा गाऊन घातला असून त्यात ती अगदी सुंदर दिसतेय. सोनमच्या व्हायरल झालेल्या फोटोत तिच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. दाढी मिशी असलेली महिलेच्या वेशात असणारी व्यक्ती चांगली चर्चेचा विषय ठरली आहे.
ही व्यक्ती कोण आहे आणि या वेशात का आहे हा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडला आहे. त्या व्यक्तीचं नाव लिओ कल्याण आहे. डोहाळे जेवण्याच्या कार्यक्रमात लिओ ने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. लिओ कल्याण हा ब्रिटिश गीतकार तसच प्रोफेशनल मॉडेल देखील आहे. लिओ हा समलैंगिक असून, त्याची अनेक गाणी समलैंगिक लोकांच्या आयुष्याचं दर्शन घडवून आणणारी आहेत. लिओ चा मोठा चाहता वर्ग देखील आहे.

Latest Posts

Don't Miss