spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ग्रीको-रोमन अंडर 17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सूरज वशिष्ठने बाजी मारली, 32 वर्षांनी जिंकून दिले गोल्ड मेडल

16 वर्षीय सूरज वशिष्ठने मंगळवारी रात्री अंडर 17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 55 किलो वजनी गटात यश प्राप्त केले आहे.

16 वर्षीय सूरज वशिष्ठने मंगळवारी रात्री अंडर 17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 55 किलो वजनी गटात यश प्राप्त केले आहे. ग्रीको-रोमन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून सुरजने इतिहास रचला. पप्पू यादव नंतर 1990 मध्ये अंडर 17 वयोगटात ग्रीको-रोमन वर्ल्ड चॅम्पियन बनणारा तो पहिला भारतीय आहे. जागतिक स्तरावर ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये भारताला अद्याप सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. भारतीय युवा सुरज याने 55 किलो वजनी गटात युरोपियन चॅम्पियन अझरबैजानच्या फरेम मुस्तफायेवचा 11-0 असा पराभव केला.

पप्पू यादवने 1990 आणि 1992 मध्ये अनुक्रमे U17 आणि U20 गटात सुवर्णपदक जिंकले होते. दरम्यान, विनोद कुमारने 1980 मध्ये ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये U17 सुवर्णपदक जिंकले होते. सुरजने युरोपियन चॅम्पियन फरीम मुस्तफेववर 11-0 असा मोठा विजय मिळवला. सूरजने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमणाला सुरुवात करत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच त्यांनी 3-0 अशी आघाडी घेतली. युरोपियन कुस्तीपटूला पुनरागमनाची संधी नव्हती. तब्बल 32 वर्षानंतर सूरजने इतिहास रचलेला आहे.

हेही वाचा : 

भूपेंद्र पटेल मंत्रीमंडळाच्या प्रयोगाची राज्यात शक्यता, शिंदे,फडणवीस आज दिल्ली दरबारी

“मला माझ्या वजन प्रकारात जगातील सर्वोत्तम कुस्तीपटू व्हायचे आहे. सीनियर वर्ल्ड जेतेपद हे माझे स्वप्न आहे”, असे सुरज आपले मत व्यक्त केले.

Latest Posts

Don't Miss