spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतेले निर्णय लवकर कृतीत उतरवावे : अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज यांनी २८ जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेट दिली

गडचिरोली : विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज यांनी २८ जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेट दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. गेल्या महिनाभरापासून विदर्भात पावसाने हाहाकार उडाला आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होती. या पुराचा फटका गावकऱ्यांना बसला आहे. शेकडो एकर शेती पाण्याखाली आली पिकांची नासाडी झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार हे गडचिरोली मध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, त्यांनी दोन मंत्र्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा : 

ग्रीको-रोमन अंडर 17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सूरज वशिष्ठने बाजी मारली, 32 वर्षांनी जिंकून दिले गोल्ड मेडल

पवारांनी म्हटले, “पूरग्रस्तांना मदत नाही, शेतकरी संकटात आहे. दिवसभर सह्या केल्या, तरी फायली संपणार नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही नुकसानभरपाई मिळालेली नाही. पावसामुळे जवळपास 10 लाख हेक्टर जमीनचे विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. फक्त दोघांना संपूर्ण राज्य चालवणे शक्य नाही, हम दो आणि बाकी कुणी नाही असा सध्याचा कारभार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मदत करतोय सांगण्यापेक्षा ती कृतीत उतरवावी, असे आवाहनही अजित पवारांनी केले.

मंत्रीमंडळाच्या बैठकी दरम्यान महत्वाचे निर्णय, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान

Latest Posts

Don't Miss