spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्रीच्या शिवसेना नेत्यांशी भेटीगाठी सुरूच, आजची भेट लीलाधर डाकेंशी

शिवसेना आमदारांसोबत बंड पुकारत नवे सरकार स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना भेटण्याचे सत्र सुरूच आहे.

मुंबई : शिवसेना आमदारांसोबत बंड पुकारत नवे सरकार स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना भेटण्याचे सत्र सुरूच आहे. आज मुख्य्मंत्र्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. लिलाधर डाके यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी ही भेट झाली. एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे आमदार, खासदार फोडल्यानंतर आता सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडे वळले दिसून येत आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे पुढील भेट मनोहर जोशी यांचीही भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लीलाधर डाकेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

“शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची मी आज सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस कऱण्यासाठी आलो होतो. शिवसेनेचे बळ वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान असून, ते मी जवळून पाहिलेल आहे. बाळासाहेबांसोबत सुरुवातीपासून जे नेते होते त्यामध्ये लिलाधर डाकेदेखील होते. आनंद दिघे आणि त्यांचे जवळचे संबंध होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिवसेना वाढवण्याचे काम केले. शिवसेनेच्या वाढीत त्यांच्यासारख्या नेत्यांचं फार मोठं योगदान आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

हेही वाचा : 

कॉंग्रेसच्या खासदाराने द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हणून संबोधले, संसदेत भाजपकडून गदारोळ

Latest Posts

Don't Miss