spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उपरवाले के घर देर है अंधेर नहीं , उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

सध्या बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा कसोटीचा काळ सुरु आहे.

मुंबई : सध्या बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा कसोटीचा काळ सुरु आहे. पक्ष गळतीमुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे आता सत्तेसाठी मैदानात उतरले आहेत. आंबेडकरी चळवळीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले आणि त्याचे शिवसेनेत स्वागत केले. त्यांच्यासोबत आणखी काही महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारेंवर उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली. त्याच बरोबर शिवसेनेचे कार्यकर्ते, नेतेमंडळीना आवाहन केले कि, ज्यांना शिवसेनेने मोठे केले ते निघून गेलेत. आता सामान्य लोकांना अतिसामान्य करायचे आहे, त्यांची नसलेल्या शिवसेनेची बांधणी सुरू आहे. पण आपल्याला असलेल्या शिवसेनेची पुनर्बांधणी करायची आहे. असे आवाहनही शिवसेना कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी केले. त्याच बरोबर ‘उपरवाले के घर देर है अंधेर नहीं’ म्हणत शिंदे गटाला इशाराही दिला आहे.

हेही वाचा : 

मुख्यमंत्रीच्या शिवसेना नेत्यांशी भेटीगाठी सुरूच, आजची भेट लीलाधर डाकेंशी

या प्रसंगी सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया

सुषमा अंधारे यांनी म्हटले, “माझे हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नाही, त्याक्षणी चांद्यापासून बांद्यापर्यंत जोडला गेलेले कार्यकर्ते माझ्यासोबत शिवसेनेत प्रवेश करत आहेत, माझ्या डोक्यावर ईडीचे ओझे नाही, ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोग अशा सर्व स्वायत्त संस्थांना हाताशी धरुन जर इथे संविधानिक लोकशाहीची चौकट मोडण्याचा प्रयत्न केला जात. मी आत्तापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून जो लौकिक मिळाला आहे. त्यानुसार मी काम करत राहिन. आज जोरजोरात रडायचे आणि उद्या दुसऱ्या गटात सामिल व्हायचे हे माझ्याकडून होणार नाही”. असे भावना सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.

शिंदे – फडणवीस सरकारचा नवा निर्णय, जितक्याचं रिचार्ज तितक्याचीच मिळणार वीज…

Latest Posts

Don't Miss