spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संसदेत स्मृती इराणी सोनिया गांधी आमने सामने, अधीर रंजन चौधरींच्या वक्तव्याचा वाद पेटला

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला आता एक वेगळे वळण मिळाली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला आता एक वेगळे वळण मिळाली आहे. भाजपने संसदेत काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. काँग्रेसवर हल्लाबोल करताना भाजप नेत्या तथा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया गांधींना या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, परिस्थिती आणखी बिघडली.

सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात जोरदार वादविवाद झाले आहेत. सभागृह काही वेळासाठी तहकूब झाल्यानंतर भाजप खासदारांनी सोनिया गांधींच्या राजीनाम्याच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. वादविवाद सुरु असताना सोनिया गांधी भाजप खासदार रमा देवी यांच्यासोबत बोलत होत्या. अधीर रंजन यांच्या वक्तव्याच्या वादात माझे नाव घेऊ नका, असे सोनिया गांधी रमा देवींनी सांगत होत्या. त्याच वेळी स्मृती इराणी तिथे पोहोचल्या आणि मी तुमचे नाव घेतले असं म्हणाल्या. महिलांशी संबंधित मुद्दा असल्याने आणि तुम्ही सभागृहात उपस्थित आहात म्हणून तुमचे नाव घेतल्याचे स्मृती इराणीयांनी म्हटले.

हेही वाचा :  

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली भेट

Latest Posts

Don't Miss