spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

राज्यात सरकार शिंदे स्थापन झाल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

मुंबई : राज्यात सरकार शिंदे स्थापन झाल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. शिंदेंच्या या दौऱ्याला आज पासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री राज्यातील विकास कामांचा आढावा घेणार आहेत. त्याच बरोबर राज्यात अतिवृष्टी झालेल्या भागात पाहणी करून शेतकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आज दुपार नंतर मुख्यमंत्री शासकीय निवास स्थानाहून नाशिक नाशिक मार्गे मालेगावकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर रात्री 10 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचं मालेगाव शासकीय विश्रामगृहावर आगमन होईल. रात्री विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी 30 जुलै पासून मुख्यमंत्री खऱ्यायार्थी पाहणी दौऱ्याला सुरुवात करतील.

सध्या विरोधीपक्ष नेते अजित पवार देखील राज्यातील पूरग्रस्त भागात पाहणी करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ते आज दुपारी ओझर विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर ते उद्या धुळे येथील एका कार्यक्रमाला देखील उपस्थित रहाणार आहेत.

नुकतीच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी देखील शिवसंवाद यात्रा काढली होती. या यात्रेत केंद्र स्थानी राहीला तो नाशिक जिल्हा आणि संभाजीनगर. शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात शक्ति प्रदर्शन पाहायला मिळाले. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्याला विशेष महत्व आहे. तरी दरम्यान या दौऱ्यात मुख्यमंत्री राज्यातील जनतेसाठी काय मोठ्या घोषणा करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : 

पुण्यापाठोपाठ अमरावतीतून देखील समोर आला बेपत्ता मुलींचा धक्कादायक आकडा समोर…

Latest Posts

Don't Miss