spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आम्हाला प्रतिप्रश्न करण्यापेक्षा कार्यवाही करा, अजित पवारांचा राज्य सरकारला इशारा

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार हे सध्या राज्यात अतिवृष्टी भागाची पाहणी करत आहेत.

नागपूर : राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार हे सध्या राज्यात अतिवृष्टी भागाची पाहणी करत आहेत. आज त्यांनी नागपूरमधील अतिवृष्टी भागाचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे शेतकरी व्याकूळ झाला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशी गंभीर स्थिती असल्याचे अजित पवार म्हणाले. पूरग्रस्त भागात अजूनही पंचनामे झाले नाहीत. त्याठिकाणी तत्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत होणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. हा दौरा राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असल्याचेही पवार म्हणाले. तसेच सरकारवर निशाणा साधताना आम्हाला प्रतिप्रश्न करण्यापेक्षा ठोस कार्यवाही करा, अशा शब्दांत त्यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले आहे.

परिस्थितीचा आढावा घेतल्या नंतर पवारांची प्रतिक्रिया

“अतिवृष्टीमुळे या भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आम्ही विचारणा केली तर तुम्ही मंत्रिमंडळात किती जण होते? अशी उत्तर दिली जात आहेत. पण हे यावरच उत्तर नाही. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे कसे ताबडतोब सुरु होतील? पुरग्रस्तना मदत कशी होईल? दुबार पेरणीसाठी बियाण कसे मिळेल? हे यावर उत्तर अपेक्षित आहेत. पण यावर कोणी बोलत नाही. मी राजकारण करण्यासाठी हा दौरा करत नाहीए. राज्यावर संकट ओढवले असताना विरोधकांची जी भूमिका असते ती पण महत्वाची असते. या दौऱ्यानिमित्त दुसऱ्यांनी निवेदन देऊन त्यावर आपण बोलणं आणि आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यातील बारकावे समजतात. नंतर ते चांगल्या पद्धतीनं सभागृहात मांडता येतात. फील्डवर जाताना अनेक प्रकारचा त्रासही सहन करावा लागतो”, असे अजित पवार यांनी म्हटले.

हेही वाचा : 

आरेमधील वृक्षतोडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता

Latest Posts

Don't Miss