spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईसह ठाण्यात स्वाईन फ्लूचा फैलाव,आठवड्याभरात पाचपट रुग्णसंख्येत वाढ

मुंबईसह ठाण्यात ‘स्वाईन फ्लू’चा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे.

मुंबई : मुंबईसह ठाण्यात ‘स्वाईन फ्लू’चा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. गेल्या आठवडय़ाभरात मुंबईत ‘स्वाईन फ्लू’ची रुग्णसंख्या पाचपट वाढली असून, ठाण्यात तीन दिवसांत दुप्पट रुग्णनोंद झाली आहे. तर अंबरनाथमध्ये एका रुग्णाचा मृत्यू जल आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यातील ‘स्वाईन फ्लू’च्या बळींची संख्या तीनवर गेली आहे.

मुंबई, ठाण्यात डेंग्यू, मलेरियाबरोबरच ‘स्वाईन फ्लू’ने डोके वर काढले आह़े मुंबईत जूनमध्ये ‘स्वाईन फ्लू’चे दोन रुग्ण होत़े त्यानंतर जुलैमध्ये रुग्णवाढ होऊ लागली शहरात जुलैच्या केळव 15 दिवसात 11 रुग्ण आढळले होते. मात्र, 17 ते 24 जुलै या कालावधीत रुग्णसंख्या 11 वरून थेट 66 वर पोहोचली म्हणजेच जानेवारी आणि जूनमध्ये आढळलेल्या प्रत्येकी दोन रुग्णांसह 24  जुलैपर्यंत शहरात ‘स्वाईन फ्लू’चे एकूण 66 रुग्ण आढळले आहेत.

हेही वाचा : 

मुख्यमंत्री शिंदे व अमित शहा यांच्या भेटीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला

स्वाईन फ्लूची लक्षणे

ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, उलटय़ा, जुलाब ही ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे आहेत. गर्भवती महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रुग्णांमध्ये लक्षणे तीव्र होऊन आजार गंभीर स्वरुप धारण करू शकतो. धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, उलटीतून रक्त पडणे अशी गंभीर लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

आम्हाला प्रतिप्रश्न करण्यापेक्षा कार्यवाही करा, अजित पवारांचा राज्य सरकारला इशारा

Latest Posts

Don't Miss