spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

निपुण धर्माधिकारी चे बॉलिवूड मध्ये पदार्पण

मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेता व दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करतो आहे.

अभिनेता शाहिद कपूर व अभिनेत्री अमृता राव यांच्यावर चित्रित झालेलया ‘इश्क विश्क’ चित्रपटाच्या सीक्वेलची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ‘इश्क विश्क रिबाउंड’ असं या सीक्वेलचं नाव आहे. मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेता व दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करतो आहे.

दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी ने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचे मोशन टीझर शेअर केले आहे. या पोस्ट खाली अनेकांनी निपुणला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी ही त्याचे कौतुक केले आहे. अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री अमृता राव यांनी ‘इश्क विश्क’ चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. आता ‘इश्क विश्क रिबाउंड’ या सीक्वेल मध्ये रोहित सराफ, पश्मिना रोशन, यायला ग्रेवाल आणि  जिब्रान खान हे नवोदित कलाकार दिसणार आहेत. परंतु अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर  करण्यात आलेली नाही.

चित्रपटाचं पोस्टर शेअर करत निपुण ने लिहिले, दिगदर्शन असलेला हा माझा पहिला हिंदी चित्रपट. जेव्हा ऑनलाईन अँप्स वर नवीन नाती शोधली जाऊ शकतात आणि चॅट मध्ये ती गमावली जाऊ शकतात तेव्हा लक्षात येते प्रेमाला अपग्रेडची आवश्यकता आहे. इश्क विश्क रिबाउंड आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. चित्रपटाचे निर्माते रमेश तौरानी म्हणतात, इश्क विश्क रिबाउंड आधुनिक काळातील प्रेमाचे विचार अपग्रेड करेल. चित्रपटाचे शूटिंग छान सुरु आहे.

 

निपुणने या आधी मराठीतील ‘बापजन्म’, ‘धप्पा’ व ‘मी वसंतराव’ सारखे चित्रपट त्याचबरोबर ‘मिस मॅच’ सारख्या गाजलेलया हिंदी वेबसीरिजचे दिग्दर्शन ही केले आहे.

Latest Posts

Don't Miss