spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईच्या अंधेरी भागात भीषण आग; अग्नीशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

घटनास्थळावरून काळ्या धुराचे लोट उठताना दिसत होते. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या

मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील एका स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स परिसरात भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय.अग्निशम दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात असलेल्या स्पोर्ट कॉम्पेक्स परिसरातील डी एन नगरात ही भीषण आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांमार्फत ही आग विझविण्याचा प्रयत्न केला जात आहे. घटनेतील जीवितहानीबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी (पश्चिम) उपनगरातील एका चित्रपटाच्या सेटवर आग लागली. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या शेजारी असलेल्या चित्रकूट ग्राऊंडवर लावण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवर संध्याकाळी 4.30 च्या सुमारास आग लागली, असे तिने सांगितले.

याआधी, अधिकाऱ्यांनी सांगितले होते की आग परिसरातील एका दुकानात लागली होती, परंतु नंतर त्यांनी पुष्टी केली की ती एका चित्रपटाच्या सेटवर होती. घटनास्थळावरून काळ्या धुराचे लोट उठताना दिसत होते. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या आणि आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते, अधिकारी म्हणाले की, कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही

Latest Posts

Don't Miss