spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरातून संतापाची लाट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. कोश्यारी यांच्या विधानामुळे मुंबईचा अपमान झाल्याचे विरोधकांनसह नागरिकांचे म्हणणे आहे. “गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही”, असे वक्तव्य भगसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्याच्या या वक्तव्यमुळे राज्यभरातून विरोधक आपली प्रतिक्रिया मांडत आहे.

मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा… : संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल, तर शिवसेनेचे नाव घेऊ नका.मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.

राज्यपालांच्या या विधानबाबत आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करणार… : दीपक केसरकर

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले, राज्यपालांनी जे विधान केले आहे ते राज्याचा अपमान करणारे विधान आहे. राज्यापाल हे संविधानिक पद असून त्यांच्यासंदर्भात केंद्र शासनाला लिहिण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळे राज्यपालांकडून पुन्हा अशी विधान येणार नाही, याबाबत केंद्र शासन त्यांना समज बजावू शकते. असे केसरकर यांनी मत मांडले.

मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा : आ. अमोल मिटकरी

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले की, महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, आमदार मिटकरी यांची मागणी.

राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही… : आ. नितेश राणे

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी म्हटले, राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले?किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले?तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात. असे नितेश राणेंनी म्हटले.

हेही वाचा :  

शिंदे सरकार घेणार नवा निर्णय; दहीहंडीला मिळणार सार्वजनिक सुट्टी?

Latest Posts

Don't Miss