spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“50 खोकेवाले कुठे लपून बसले?” कोश्यारींच्या वक्तव्यावरून राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबई विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांकडून त्याच प्रमाणे नागरिकांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. शिवसेना खासदार तथा शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील राज्यपालांसह शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

 संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे. थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे. 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे ऐकताय ना की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल, तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा. दिल्ली पुढे किती झुकताय?”, असा प्रश्न राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला.

 पुढे राऊत म्हणाले, “आता तरी ऊठ मराठ्या ऊठ शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले? याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत. मराठ्या तुलाच उठावे लागेल, मराठी माणसाचा इतका द्वेष का ? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.

हेही वाचा : 

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरातून संतापाची लाट

Latest Posts

Don't Miss