spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्र दौऱ्याला आज पासून आरंभ झाला आहे.

मालेगाव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्र दौऱ्याला आज पासून आरंभ झाला आहे. दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री विविध विकासकामांचा आढावा घेतला. आमचे निर्णय शेतकरी आणि लोकहितासाठी आहेत. राज्यात सगळीकडे सकारात्मक चर्चा सुरु आहे. आम्ही जनतेच्या हिताचे निर्णय अनेक दिवसांपासून घेत आहोत. पोलिस भरती सुध्दा लवकरच निघणार आहे. लोकांच्या हिताचे सगळे निर्णय आम्ही घेणार आहोत. राज्यात जिथं-जिथं अडचण आहे, तिथे सरकार मदत करणार आहे. आरोग्य विभाग, कृषी विद्यापीठे सक्षम करण्यावर आमचा अधिक भर आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले.

या महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केल्या नंतर शिंदे यांनी राज्यपालांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले शिंदे म्हणाले, राज्य्पालंचे केलेले हे विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. 106 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे देखील योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे. मराठी माणसाच्या अस्मितेची कुणालाही अवहेलना करता येणार नाहीय. असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

हेही वाचा : 

महाराष्ट्राचा अपमान कराल तर कोल्हापुरी जोडा दाखवू : उद्धव ठाकरेंची राज्यपालांवर जहरी टीका

Latest Posts

Don't Miss