spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊतांच्या घरावर ईडीचा छापा; राजकीय वर्तुळातून उमटल्या प्रतिक्रिया…

ट्विटसच्या माध्यमातून संजय राऊत यांनी आपला विरोध व्यक्त केला आहे आणि याच ईडीच्या कारवाईबाबत आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. आज दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे. या कारवाईच्याविरोधात ट्विटसच्या माध्यमातून संजय राऊत यांनी आपला विरोध व्यक्त केला आहे आणि याच ईडीच्या कारवाईबाबत आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

राऊतांविरोधतच्या कारवाईबाबत ट्विट करत किरीट सोमय्या म्हणतात, ईडीच्या कारवाईचं स्वागत करतो. संजय राऊतांना हिशोब द्यावा लागणार. १२०० कोटींचा पत्राचाळ घोटाळा असो, किंवा माफियागिरी असो. आज महाराष्ट्राची जनता अत्यंत आनंदी आहे. पण संजय राऊतांना हिशोब द्यावा लागणार.

ईडीच्या या कारवाईनंतर भाजपा नेते नितेश राणे यांनी संजय राऊयांना टोला लगावला. एबीपी माझाशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “सगळ्यांची सकाळ खराब करणारे संजय राऊत यांची सकाळ खराब झाल्याचे बघून समाधान मिळतंय”

तसेच या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणतात, ”या यंत्रणांना तपासाचा अधिकार आहे, त्यानुसार ते तपास करतायत. प्रत्येक नागरिकाच्याबाबतीत चौकशी करण्याचा अधिकार ईडीला आहे. आता हे कसं झालंय, पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे का येतात, ते फक्त राऊतच सांगू शकतात.

शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनीही संजय राऊतांविरोधात होणाऱ्या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट म्हणतात, या कारवाईमुळे आम्ही आनंदी आहोत राऊतांच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली. पवारांच्या नादी लागून त्यांनी वाटोळं करुन घेतलं, तसेच, त्यांच्या अटक होण्याची शक्यता जास्त आहे, असंही शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाटांनी सुनावल्यानंतर आता रामदास कदमांनी देखील संजय राऊतांवर ईडीप्रकरणी बोचरी टीका केली आहे. “संजय राऊत हे स्पष्टोक्ते आहेत, माझे चांगले मित्रही आहेत पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ न घेता शरद पवारांची शपथ घ्यायला पाहिजे होती”.

या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना संजय राऊतांवरील कारवाईबाबत विचारलं असता म्हणाले की, विकास प्रकल्पाची मोठी कारवाई करायची आहे. एवढं एकच वाक्य बोलून शिंदे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.

Latest Posts

Don't Miss