spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदेचा औरंगाबाद दौरा; दौऱ्यादरम्यान केल्या मोठ्या घोषणा…

मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार आहे, अशी घोषणा केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यातील काही महत्त्वाचे निर्णय म्हणजे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांचा आढावा शिंदे सरकारने घेतला. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कमी कराव्यात याकरिता प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतले जातील, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना प्लान तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे यासाठी लवकरच जिल्हाधिकरी, विभगीय आयुक्त आणि बँका यांची लवकरच एक बैठक होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त मराठवाड्यातील दुष्काळ कमी करता यावा यासाठी पश्चिमेकडील नद्यांमधील वाया जाणारे पाणी दुष्काळी भागात वळवण्याच्या प्रकल्पालाही लवकर सुरुवात करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे यावेळी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार आहे, अशी घोषणा केली आहे. सांगलीतील संकेत सर्गर या खेळाडूने कॉमनवेल्थ गेम्स मध्ये रौप्य पदक मिळवल्यामुळे त्याला तीस लाख रुपये तर त्याच्या प्रशिक्षकाला साडेसात लाख रुपये देण्याची मोठी घोषणा देखील त्यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद मध्ये प्रलंबित असणाऱ्या गोपीनाथ मुंडे स्मारकाच्या प्रश्नाला देखील लवकरच चालना मिळण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

त्याचबरोबर पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास देखील केला जाणार आहे आणि पीपीपी मॉडेल यशस्वी होत नसल्याने दुसऱ्या मॉडेलचा उपयोग करून टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम देखील लवकर पूर्ण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच वेरूळ कृष्णेश्वराच्या विकासाची मागणी, नांदेड शहराच्या रस्त्याचे प्रस्ताव, आणि परभणी समांतर पाणीपुरवठा योजना यासारख्या अनेक प्रलंबित रस्तावांचे आणि त्याचबरोबर नांदेड जालना येथील समृद्धी हायवे तयार करण्याचे काम लवकरच करणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तात्काळ करण्यासारखे प्रस्ताव मिडटर्म आणि लॉन्गटर्म चे प्रस्ताव पाठवून ते लवकरच मार्गी लावण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले.

Latest Posts

Don't Miss