spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दिनेश कार्तिक साठी वीरेंद्र सेहवाग ने केले ट्विट चर्चेत

सामन्यात दिनेश कार्तिक आणि आवेश खान यांनी बाजी मारली आहे. सामना संपल्यानंतर वीरेंद्र सेहवागने एक ट्विट केले आहे, जे सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे.

दिनेश कार्तिक ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात पुनरागमन केल्याने अनेक दिग्गज व चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.
मधल्या बऱ्याच काळानंतर फलंदाज दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन केले आहे.
कार्तिकने १६ वर्षांच्या टी २० कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आहे. पण कार्तिक चा हा खेळ इतका शानदार होती की, माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि सुरेश रैना ही त्याचे पुन्हा चाहते झाले.

दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २७ चेंडूत ५५ धावा केल्या. कार्तिकच्या खेळामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा ८२ धावांनी पराभव केला आणि मालिकेचा निकाल पाचव्या आणि शेवटच्या T20 सामन्यावर नेला. कार्तिकच्या खेळीने माजी क्रिकेटपटू त्याच्या कामगिरीवर खुश झाले आहेत. कालच्या सामन्यात दिनेश कार्तिक आणि आवेश खान यांनी बाजी मारली आहे. सामना संपल्यानंतर वीरेंद्र सेहवागने एक ट्विट केले आहे, जे सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे.

‘स्कॅन 1992’ या वेब सिरीजमधील हर्षद मेहता चा एक मीम शेअर केला आहे. कार्तिकचे हे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक आहे. आवेश खानने चार विकेट घेत सामन्यात चांगली कामगिरी बजावली. भारताने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. वीरेंद्र सेहवाग दोघांच्याही उत्कृष्ट कामगिरीचे कौतूक केले. वीरेंद्र सेहवाग ने दिनेश कार्तिकसाठी हे मजेदार ट्विट शेअर करत त्याचे ही कौतुक केले आहे. त्याचसोबत सुरेश रैनाने टीम इंडियाला मिळवलेल्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

पहिले दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडिया मालिकेत 0-2 ने पिछाडीवर होती. टीम इंडियासाठी दोन्ही सामन्यात जिंकू किंवा लढू अशी परिस्थिती होती, भारतीय संघाने हा सामना जिंकून दाखवला. देशभरातून या गोष्टीचे कौतुक होत आहे. या व्यतिरिक्त दिनेश कार्तिकसाठीही ही मालिका खूप खास होती. आयपीएलमधील चांगल्या कामगिरीनंतर दिनेश कार्तिकला पुन्हा टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. तेव्हा त्याने या संधीचे सोने करून घेऊन टी-20 विश्वचषकासाठी संघातील आपले स्थानही निश्चित केले आहे.

Latest Posts

Don't Miss