spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सत्ताकारण विनोदी पद्धतीने मांडणारी वेब सीरिज ‘मी पुन्हा येईन’ झाली प्रदर्शित

हेच सत्ताकारण अगदी विनोदी पद्धतीने लोकांसमोर मांडणारी मराठी वेब सिरीज म्हणजे 'मी पुन्हा येईन'.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातलं सत्ताकारण बरंच चर्चेत आहे. म्हणजे दोन पक्षांची होणारी युती. अचानक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणे. शिंदे आणि भाजपची झालेली युती. कुठेतरी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटत असताना शिंदेंचे मुख्यमंत्री होणे. अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी कमी वेळात घडून गेल्या. हेच सत्ताकारण अगदी विनोदी पद्धतीने लोकांसमोर मांडणारी मराठी वेब सिरीज म्हणजे ‘मी पुन्हा येईन’. या वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या वेब सेरिजबद्दल उत्सुकता लागून होती.

अरविंद जगताप लिखित, दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘मी पुन्हा येईन’ची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे.

नुकतेच ‘मी पुन्हा येईन’चे तीन भाग प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. या तीन भागांना प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून सीरिजचे पुढील भाग प्रदर्शित करण्यात येतील. ‘मी पुन्हा येईन’मध्ये फसवणूक, आमदारांची पळवापळवी, राजकारण, सत्तानाट्य अशा अनेक मुद्द्यांचे अगदी विनोदी शैलीत चित्रिकरण करण्यात आले आहे. वेबसीरिजचे दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, “सध्याच्या राजकारणाशी याचा काहीही संबंध नसून निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने याची निर्मिती करण्यात आली आहे. राजकारणामागील गोष्टी या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील.”

ट्रेलर:

Latest Posts

Don't Miss