spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यात ‘प्रति-मुख्यमंत्री’

सध्या पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती पाहायला मिळत आहे.

पुणे – सध्या पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंसारखा वेष करणाऱ्या या व्यक्तीचे नाव ‘विजयराजे माने’ असे आहे. विजयराजे माने हे भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्र्यांप्रमाणे वेष धारण करून वावरत आहेत. भारदस्त दाढी आणि पांढऱ्या कपड्यांमुळे अनेकजण माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी येत आहे; तसेच मला शिंदेसाहेब समजून माझ्याजवळ निवेदने करत आहेत असे विजयराजे असे म्हंटले आहे. ते काही दिवसांपासून या पद्धतीचा लुक कॅरी करत आहेत. एकूणच पुण्याला ‘प्रति-मुख्यमंत्री’ लाभले आहेत असे मानले जात आहे.

शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्यासारखी वेशभूषा करून पाहिली!

महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्तापालटानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. या काळात त्यांच्या प्रसिद्धीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. तेव्हा तुम्ही पांढरे कपडे घातल्यावर मुख्यमंत्र्यासारखे दिसाल हा सल्ला अनेकांनी दिला असे भारतीय जनता युवा मोर्चाचे पुण्यातील पदाधिकारी विजयराजे माने सांगतात. सर्व कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून मी पांढरे कपडे परिधान करायला लागलो. जेव्हा लोक मला तुम्ही हूबेहूब एकनाथ शिंदेंसारखे दिसता असे सांगतात, तेव्हा मलाही आनंद होतो.

जनतेची सेवा करण्यासाठीची संधी

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखा लुक केला असून त्यांच्याप्रमाणे लोकसेवेचे कार्य करणार असल्याची ग्वाही विजयराजे माने यांनी दिली आहे. माणूस फक्त दिसण्यावरून प्रसिद्ध होत नसतो, त्यासाठी काम देखील करावे लागतं असे त्यांचे मत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला प्रेरणास्थानी आहेत. लोकांना मदत करण्यासाठी मी नेहमी पुढे असेन. जनतेची सेवा करायची संधी मला मिळाली, तर निवडणूकही लढवेन असे विजयराजे माने यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे दौरा उद्यापासून सुरु होत आहे. या दौऱ्यामध्ये शिंदेसाहेबांना भेटून त्यांच्यासोबत याच लुक मध्ये फोटो काढायची इच्छा असल्याचे माने यांनी सांगितले आहे.

हेही पहा :

https://www.timemaharashtra.com/politics/uddhav-thackeray-side-i-am-proud-of-sanjay-rauta/4181 

Latest Posts

Don't Miss