spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री पुण्याकडे रवाना, आज ठाकरे व शिंदे एकाच पिचवर

पुणे : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या नंतर प्रथमच महाराष्ट्र दौरा करत आहे. आज मुख्यंत्री हे पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. सासवड येथे पश्चिम महाराष्ट्रातील पहिली जाहीरसभा असणार आहे. पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुंजवणी प्रकल्प, फुरसुंगी उसळी पाणी योजना, हवेलीतील गावाच्या आवाजावी कर आणि दिवे येथील राष्ट्रीय बाजार अशा मुद्द्यांवर या सभेमध्ये चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गुलाबराव पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील इत्यादी मान्यवर व नेते या सभेला उपस्थित राहणार आहे.

आज ‘शिवसंवाद यात्रेचा’ मुक्काम पुणे

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पक्ष गळती सुरु झाली. त्यानंतर शिवसेनेला पुन्हा एकदा भक्कम करण्यासाठी शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्यात विविध ठिकाणी त्यांची ‘निष्ठा’ यात्रा आणि ‘शिवसंवाद’ यात्रा सुरु आहे. आदित्य ठाकरे हे आज मंगळवारी पुणे शहराच्या दौऱ्यावर जाणार आहे. दुपार नंतर 5 च्या सुमारास कात्रज चौकातील बस डेपोजवळ त्यांची जाहीर सभा होणार आहे. आदित्य ठाकरे हे आपल्या दौरातून शिवसेनेतील बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांना इडीने अटक केल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे. यात आज एकनाथ शिंदे व आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर अजून जाहीर सभेत नेमके काय होणार ? याची राजकीय वर्तुळात अनेकांना उत्सुकता आहे.

हेही वाचा : 

संजय राऊतांच्या अटकेनंतर आता यांची वेळ म्हणत, नितेश राणेंचा बाण आता अनिल परबांवर

Latest Posts

Don't Miss