spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठया उलथापालथी होत आहेत. नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठया उलथापालथी होत आहेत. नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केला आहे. हा आरोप करत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, एकनाथ खडसे हे भाजपची बदनामी करत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या आरोपावर अखेर एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी बोलत असताना एकनाथ खडसे म्हणाले आहेत की, “४० वर्ष अहोरात्र भाजपचं काम आम्ही केलं. मेहनतीचं फळ म्हणून मला मंत्रिमंडळात चांगलं स्थान दिलं. भाजपनं मला काहीच दिलं नाही असं मी कधीच म्हटलं नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच एकनाथ खडसे पुढे म्हणाले आहे, “४० वर्ष हमाली केल्यानंतरही भाजपनं ऐनवेळी माझं तिकिट कापलं. त्यानंतर मला राष्ट्रवादीनं मला आमदार केलं. त्यामुळे मी राजकारणात आहे. माझा राग भाजपवर नव्हता आणि नाही हे मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो. तुम्हाला तसं वाटत असेल तर त्याचं उदाहरण दाखवा,” असंही ते म्हणाले.

तसेच एकनाथ खडसे पुढे म्हणाले आहेत की, “हे सर्व झाल्यानंतर माझा जो झळ सुरुये तो कोण करतंय? पडद्याच्या आडून ईडी, अँटी करप्शन लावायचं, इन्कम टॅक्स मागे लावायचं हे कोण करतंय हे सर्वांना माहित आहे. मी ४० वर्ष चोर, बदमाश नव्हतो, मग एकाच दिवसात दाऊदच्या पत्नीसोबतचा विषय, विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं अशा अनेक गोष्टी घडल्या. जे एक दोन लोक आहेत त्यांच्यामुळे बदनामी होतेय, या प्रवृत्तींमुळे लोकं दूर गेले,” असंही खडसेंनी नमूद केलं. “ज्यांचं भाजपमध्ये काहीच योगदान नाही त्यांनाही आता ४-५ खाती मिळतायत. आम्हाला सात खाती दिली, १० खाती दिली याचं फार कौतुक नाही. तो आमचा अधिकार होता. तुम्हाला मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून १०-१२ खाती घ्या म्हणून सांगितलं. स्पर्धकच कमी झाला पाहिजे म्हणून काय पाहिजे ते घ्या आणि मंत्रिमंडळात या असा विषय होता. मी भाजपची बदनामी केली नाही. भाजपच्या कोणत्याही नेत्यावर किंवा कोणत्याही विषयावर मी काहीही बोललेलो नाही,” असं वक्तव्य खडसेंनी केलं.

हे ही वाचा:

मुंबईतील घटनेवरून अमित ठाकरे यांनी व्यक्त केला संताप

ठाकरे पिता-पुत्रांनी डावलले, तिरुपती बालाजीने मात्र स्विकारले!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss