spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली मिरारोडच्या घटनेची दखल

मुंबईतील मीरा रोड परिसरात एका ५६ वर्षीय व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या रूम पार्टनरची निर्घृण हत्या केली आहे.

दिल्ल्लीपाठोपाठ आता मुंबईमध्ये देखील महिलांसंदर्भात अनेक धक्कदायक घटना या घडत आहेत आहे. काल दिनांक ६ जून रोजी चर्चगेट परिसरात मुलींच्या वसतिगृहात एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली तर आज दिनांक ८ जून रोजी आणखी एक धक्कदायक बाब ही अमोर आली आहे. दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखंच हत्याकांड मीरारोडमध्ये घडलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हा हादरून गेला आहे. मुंबईतील मीरा रोड परिसरात एका ५६ वर्षीय व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या रूम पार्टनरची निर्घृण हत्या केली आहे. आणि नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अश्यातच आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगानंही घेतली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. तसेच, त्यांनी ट्वीटसोबत महाराष्ट्र महिला आयोगाचं एक पत्रही जोडलं आहे. हे पत्र मिरारोडमधील घटनेसंदर्भात असून दिवसेंदिवस अशा घटना वाढत असताना गृह विभागांने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, असं महिला आयोगानं पत्रात म्हटलं आहे. त्या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की, सदरील घटना ही अंगावर शहारे आणणारी व संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आहे.लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करण्यात आले आहेत.ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे.व दिवसेंदिवस अशा घटना वाढत असताना गृह विभागांने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.आणि सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलीस आयुक्त यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने कार्यवाही करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा. तसेच मी स्वतः या संदर्भात पोलीस आयुक्त व तपास अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्कात असून याबाबत पाठपुरावा करत आहे. @maharashtra_hmo @Maha_MahilaAyog

 नेमका प्रकार काय आहे ?

मुंबईतील मीरा रोड परिसरातील उड्डाणपुलाजवळील गीता नगर फेज-७ मध्ये घडली आहे. ५६ वर्षीय मनोज साने आणि त्यांची रूम पार्टनर ३२ वर्षीय सरस्वती वैद्य एकत्र राहत होते. हे जोडपे गेल्या ३ वर्षांपासून येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. ५६ वर्षीय व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या रूम पार्टनरची निर्घृण हत्या केली आहे. आणि नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये टाकून उकळले आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करत होता. बुधवारी दिनांक ७ जून रोजी रात्री या इमारतीत राहणाऱ्या शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागली, त्यानंतर त्यांनी नयानगर पोलिस ठाण्यात माहिती दिली. घरात घुसल्यानंतर हा प्रकार नयानगर पोलिसांना समजला. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे केले होते. मृतदेहाचे सर्व तुकडे कटर मशीनने कापण्यात आले. पोलिसांनी हत्येच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. आरोपीने केलेले तुकडे कुकरमध्ये उकळले आणि मग मिक्सरमध्ये टाकून , बारीक केले आणि मग फेकले. आरोपींनी काही भाग सोसायटीच्या मागील गटारातही टाकला. शरीराचे अवयव फेकण्यासाठी त्याने दुचाकीचा वापर केला. या सर्व प्रकरणी नयानगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आणि घरातून हत्येसाठी वापरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, राहुल नार्वेकर म्हणाले…

Biporjoy वादळाचा वाढता धोका! पुढील २४ तासांत दिसू शकते रौद्र रूप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss