spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊतांच्या भाजपवर हल्लाबोल, काही उथळ नेत्यांना महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये औरंगजेब दिसतो, तुमच्या मनातील….

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत स्तन त्यांनी भारतीय जनता पार्टीवर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. यावेळी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत स्तन त्यांनी भारतीय जनता पार्टीवर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. यावेळी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक दंगलीमागे गेल्या साधारण दहा वर्ष मागे राजकारण आहे आणि राजकीय हात आहेत. ज्यांना धर्मांधतेचे राजकारण करायचं आहे अशांना एक चटक लागली आहे. महाराष्ट्रामध्ये आजही भाजप महानगरपालिका निवडणूका घ्यायची हिंमत दाखवत नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत.

मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे इथे प्रशासनाच्या माध्यमातून एकतर्फी राज्यकारभार सुरु आहे. धार्मिक उन्माद निर्माण करून निवडणुकांना सामोरे जायचं आहे. तुमचं हिंदुत्व इतकं तकलातू आहे का की कुठल्यातरी मोघल राजाचे फोटो दाखवले आणि तुमचं हिंदुत्व धोक्यात आलं. अर्धशिक्षित मुलांची माथी भडकवायची आणि राज्य अस्थिर करायचं आणि त्या आधारावर निवडणुकांना सामोरे जावे लागायचं आहे. महाराष्ट्राला मागे रेटणारं राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रातला सगळा उद्योग आणि सगळी गुंतवणूक बाजूच्या राज्यात न्यायचं अशा प्रकारचं हे कारस्थान सुरू आहे. दुर्दैवाने आपली लोक त्याला बळी पडतात असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

तसेच पुढे ते म्हणाले आहेत की, कर्नाटकात बजरंग बली हनुमान चालीसाचे तंत्र चालल नाही त्यामुळे महाराष्ट्रात त्यांना औरंगजेब घ्यावा लागला. हिंदुत्वाच्या नावाने उन्माद तयार करायचा जे हिटलरपेक्षा भयंकर आहेत. या सरकारने आम्ही कसं संभाजीनगर आणि धाराशिव केलं याच्या टिमक्या वाजविल्या होत्या ना आता त्यांच्या लोकांनी हे प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. तुम्ही पुन्हा पुन्हा संभाजीनगरला औरंगाबाद म्हणतात धाराशिवला उस्मानाबाद अधिकृतपणे म्हणत आहेत तर तुमचं कुठे गेलं हिंदुत्व तुम्हाला औरंगजेबा बद्दल प्रेम का आलं याचं उत्तर द्या. भाजपाच्या काही उथळ नेत्यांना महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये औरंगजेब दिसतो, तुमच्या मनातील औरंगजेब आधी काढा असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

तसेच राज्याचे मुख्यमंत्री ही काश्मीर दौऱ्यावर आहेत तर संजय राऊत यांनी त्यांच्या दौऱ्यावर देखील चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले आहेत की, कुटुंबासह गेले असतील बर्फ पडत आहे. बर्फाची मजा काही वेगळीच असते. इकडे उन्हाळा आहे डोकं शांत करायला गेले असतील. भविष्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर जे स्पोर्ट होणार आहेत आणि त्या संदर्भात अमित शहा यांनी त्यांना जे आदेश दिले आहेत, मंत्रिमंडळ बदलाचे आणि काही मंत्र्यांना वगळण्याचे ते ओझं घेऊन ते काश्मीरला गेले असतील. भविष्यात जर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला तर, मिंधे गटाच्या चार प्रमुख मंत्र्यांना वगळण्याच्या सूचना या अमित शहा यांनी परवाच्या भेटीत दिल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून तब्बल ४०० मुलांचं धर्मांतर

शिंदे फडणवीस सरकारवर जलील यांचे गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss