spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शरद पवारांना आलेल्या धमकीवर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

आताच्या घडीची सकाळ पासूनच सर्व प्रसार माध्यमांमध्ये शरद पवार संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार याना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

आताच्या घडीची सकाळ पासूनच सर्व प्रसार माध्यमांमध्ये शरद पवार संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार याना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मात्र हि धमकी अचानक कशी काय दिली गेली असं प्रश्न उभा राहिला आहे, राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी पोहोचलं आहे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी या मागणीसाठी शिष्टमंडळ पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “तुमचा दाभोळकर होणार,” अशी धमकी ट्वीटद्वारे शरद पवारांना दिली गेली आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी कागदपत्रासासहित मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले होती. त्यावेळी आयुक्तांकडून त्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल असे देखील सांगण्यात आले. आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “चूक करणाऱ्याला अटक करत कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार यांनी या संबधी पुण्यातुन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे त्या संदर्भात कोण तरी सौरभ पिंपळकर या नावाच्या ट्वीटर अकाउंटवर धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या ट्वीटरच्या बायोमध्ये भाजपाचा कार्यकर्ता असा उल्लेख आहे. पण, तो खरंच भाजपाचा कार्यकर्ता आहे का? याची माहिती नाही. विचारांची लढाई विचारांनी करू. प्रत्येकाला आपलं विचार आणि मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. संविधानाने सर्वांना अधिकार दिला आहे. त्याचा गैरवापर कशाला करायचा. हाणामारी आणि धमक्या देऊन काही होत नाही. राजकीय आणि राष्ट्रीय नेत्याबद्दल अशाप्रकराचे बदनामीकारक लिखाण करण्याचा अधिकार यांना कुणी दिला आहे. मात्र, सौरभ पिंपळकरचा मास्टरमाईंड कोण आहे? कुणी हे करायला भाग पाडलं? त्याच्या मोबाईलवरून कोणाशी संपर्क झाला, हे कळलं पाहिजे,” असेही अजित पवारांनी सांगितलं.

प्रत्येकाने आपला पक्ष वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. पण, कारण नसताना इतर नेत्यांची बदनामी, चारित्र्यहनन आणि जनमाणसातील प्रतिमा मलिन करायची हे प्रकार वाढत आहेत. हे दुर्देवी असून, याचा धिक्कार करतो. पोलिसांनी कठोर कारवाई करत, चूक करणाऱ्याला अटक करावी,” असेही अजित पवारांनी म्हटलं. त्यामुळे अजित पवार यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून त्यावर लवकरात लवकर तपासणीला सुरवात करावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे सांगतले आहे.

हे ही वाचा:

शरद पवारांना आलेल्या धमकीवर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

संजय राऊतांच्या भाजपवर हल्लाबोल, काही उथळ नेत्यांना महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये औरंगजेब दिसतो, तुमच्या मनातील….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss